शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट, तब्बल १२ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:02 IST

पारोळा : येथील पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता भेट ...

पारोळा : येथील पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता भेट दिली. त्यावेळी विविध विभागांचे १२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. सदर कर्मचारी नेहमी लेटफितीत असतात. या सर्वांची मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी हजेरीपत्रकात गैरहजर म्हणून नोंद केली.४ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे स्वत: सकाळी १० वाजता पारोळा पंचायत समितीत दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी आर.के.गिरासे हे रजेवर होते. डॉ.पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात बसून पंचायत समिती कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील हजेरीपत्रक मागविले. यावेळी १०.३० वाजेपर्यंत एकूण १२ कर्मचारी गैरहजर होते. लेटफितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावापुढे हजेरीपत्रकावर अबसेन्ट असे स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लिहिले. यात लघुसिंचन विभागाचे कनिष्ठ सहायक आय.यू.लोंढ, तर कनिष्ठ अभियंता आर.जे. मटकरी, व्ही.के.वाडेकर, व्ही.एम.कापुरे, व्ही.एस.राठोड यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.पंचायत समिती कार्यलयात विस्तार अधिकारी जी.एल.बोरसे, दिनेश बाबूलाल मोरे यांच्यासह आणखी तीन महिला कर्मचारी असे एकूण पाचजण लेटफितीत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागांची पाहणी केली. कर्मचा?्यांनी गळ््यात ओळखपत्र लावावे, कामकाजात सुधारणा करावी, स्वच्छतेकड लक्ष द्यावे आदी सूचना केल्या. पुन्हा आठ ते दहा दिवसात माझी पंचायत समितीला भेट असेल. त्यावेळीही रजेशिवाय कोणी गैरहजर राहिल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी केला.बायोमेट्रिक ठरतेय शोपीसपंचायत समितीच्या कार्यालयात कर्मचा?्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हे यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे कर्मचारी उशिराने येतात.