शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व त्रुटी दूर करून यंदा जळगावात वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:39 IST

संचालक प्रवीण शिनगारे यांची माहिती

ठळक मुद्देदिल्लीच्या पथकाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दिली भेटपथकाने काढल्या होत्या 19 त्रुटी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- जळगाव येथे सुरू होणा:या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेदरम्यान दिल्ली येथील पथकाने दाखविलेल्या सर्व त्रुटी दूर करून येथे यंदा वैद्यकीय शिक्षणास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट देऊन विविध त्रुटींची पाहणी केली. 

दिल्लीच्या पथकाने काढल्या होत्या 19 त्रुटीजळगावात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथे विविध कामांना वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पुरेसा सुविधा असणे गरजेचे असून त्या असल्या तरच मान्यता मिळते. त्यानुसार पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या  पथकाने 21 नोव्हेंबर जिल्हा रुग्णालयास ‘सरप्राईज’ भेट दिली देऊन आवश्यक पूर्तता आहे की नाही याची पाहणी केली होती. त्या वेळी पथकाने सादर केलेल्या अहवालात 19 त्रुटी नमूद केलेल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर 12 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन येथील सर्व विभागांची तसेच खाली केलेल्या निवासस्थांची पाहणी केली. यामध्ये प्रयोग  शाळा, बाह्य रुग्ण कक्ष, उपचाराचे प्रात्यक्षिक कक्ष अशा विविध बाबींमध्ये दिल्लीच्या पथकाने 19 त्रुटी काढल्या होत्या. या सर्व बाबी कोणत्या ठिकाणी असावे याविषयी आज पाहणी करण्यात येऊन चर्चा करण्यात आली. 

सर्व त्रुटी दूर करणारया भेटी दरम्यान शिनगारे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, दिल्ली येथील पथकाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यांची पाहणी  करण्यासाठी आलो असून त्या दूर करून यंदापासून वैद्यकीय शिक्षणास प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.  पाहणी नंतर त्यांनी अधिका:यांची बैठक घेतली. यामध्ये त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.