शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पावणे दहा लाखाचे ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त

By विजय.सैतवाल | Updated: March 22, 2024 15:22 IST

दोघांना अटक : भुसावळपाठोपाठ जळगावात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून नऊ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले.  

‘एमडी’ विक्री करणाऱ्या इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती (रा. शाहु नगर, जळगाव) याच्यासह त्याला पुरवठा करणारा गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (४०, रा. कंजरवाडा) या दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवार, २१ मार्च रोजी मध्यरात्री शाहूनगर परिसरात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे ७२ लाख ८० हजार रुपये किमतीचे  ९१० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री जळगाव येथेदेखील कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या विषयी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, २२ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी उपस्थित होते. 

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सुधीर सावळे यांना माहिती मिळाली की, शाहू नगर परिसरात इम्रान भिस्ती हा एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापला रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला ताब्यात घेतले. 

विक्रीसाठी तयार पुड्यांसह साठा जप्तइम्रान याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे नऊ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. यामध्ये विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीमध्ये तयार करून आणलेल्या १.३९ ग्रॅम वजनाच्या तीन पुड्यांसह ८५.४२ ग्रॅम व ३५.४१ ग्रॅम असे वेगवेगळे ठेवलेले पावडर स्वरुपातील एमडी पोलिसांनी हस्तगत गेले. या सोबतच आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण नऊ लाख ८५ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

पुरवठादारही जाळ्यात विक्रीसाठी आणलेले अमली पदार्थ कोठून आणले याविषयी चौकशी करत असताना हा साठा गोकूळ उमप याच्याकडून घेतल्याची माहिती इम्रानने दिली. त्यानुसार उमप यालाही अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ