शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:37 IST

प्रभाग अधिकाºयांना द्यावा लागेल आठवड्याचा अहवाल

ठळक मुद्दे नागरिकांच्या समस्या गांभिर्याने घ्या

जळगाव : शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी केवळ नगरसेवकांची नसून, अधिकाºयाची देखील आहे. मात्र, मनपाच्या अधिकाºयांकडून कोणतीही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली जात नसल्याचे सांगून महापौरांनी मनपा अधिकाºयांना धारेवर धरले.सर्व प्रभाग अधिकाºयांनी नागरिकांच्या समस्यांचा तक्रारीचा अहवाल प्रत्येक आठवड्यात महापौर व उपमहापौरांकडे सादर करण्याचा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या अधिकाºयांना दिल्या.मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात मंगळवारी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनपा गटनेते भगत बालानी यांनी मनपाच्या सर्व विभागाच्या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार सुरेश भोळे बोलत होते. या बैठकीला उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे काही नगरसेवक देखील उपस्थित होते.पाणी पुरवठा नियोजनाबाबत खोटी माहिती देवू नकामनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत परस्पर घोषणा केली जात असून, या मुद्यावरून आमदार भोळे यांनी शहर अभियंता डी.एस.खडके यांना चांगलेच धारेवर धरले. वाघूर धरणाकडून येणाºया पाईपलाईन मधील गळत्यांमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना त्या संबधी नियोजन न करता खोटी माहिती का देतात ? याबाबत देखील आमदारांनी खडकेंनाजाब विचारला. आधी वाघूर धरणाचा जलसाठ्याचा अभ्यास करा त्यानंतरच किती दिवसाआड पाणी पुरवठा करावा यासंबधीचे वक्तव्य करा असेही सांगितले.हेल्पलाईनवरील एकही तक्रार प्रलंबित असता कामा नयेमनपाच्या हेल्पलाईनवर वर्षभरापासून तब्बल १४०० तक्रारी प्रलंबित असून, या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने आमदार भोळे यांनी चारही प्रभाग अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.कंत्राटी भरतीबाबत धुळे मनपाकडून माहिती घ्यायावेळी अधिकाºयांनी देखील आमदारांकडे आपल्या अडचणी मांडल्या. मनपातील अनेक पदे रिक्त असल्याने मनपात काम करताना अडचणी येत असल्याची तक्रारी अधिकाºयांनी मांडली. त्यावर शासनाकडे दिलेला आकृतीबंद मंजूर व्हावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली. तसेच हा आकृतीबंद मंजूर होईपर्यंत मनपातील रिक्त जागा या कंत्राटी पध्दतीने भरण्यात येतील, यासाठी धुळे व मालेगाव महापालिकेकडून माहिती घेण्यात यावी अशाही सूचना आमदारांनी दिल्या.सफाई कर्मचारी दारु पिवून कचरा उचलतात-नेरकर1 सफाई कर्मचारी कचरा संकलन करताना दारु पिवून येत असल्याची धक्कादायक माहिती भाजपाच्या नगरसेविका सरीता नेरकर यांनी या बैठकीत दिली. मात्र,याबाबत आरोग्य अधिकाºयांकडे तक्रार केले असता, त्यांनी सफाई कर्मचाºयावर कारवाई न करता यामध्ये राजकारण असल्याचे उत्तर दिल्याची माहिती नेरकर यांनी दिली.2 त्यावर देखील उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी मपना आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याकडून खुलासा मागितला. तसेच ज्या अधिकाºयांना राजकारण करायचे असेल त्यांनी आमच्या पक्षात यावे असा टोला देखील आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाºयांना लगावला. ज्या भागात सफाई कर्मचाºयांकडून कचरा उचलला जात नसेल त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.