नंदुरबार : जुळ्या मुलांसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तेलखेडी, ता.धडगाव येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस सूत्रांनुसार, तेलखेडी येथील विशाबाई कोटा पावरा (24) या महिलेला प्रेम व पुनाबाई ही दोन वर्षाची जुळी मुले आहेत. घरात कुणी नसताना विशाबाईने दोन्ही मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजेनंतर ही बाब घरच्या लोकांना कळल्यावर खळबळ उडाली. धडगाव पोलिसांना कळविण्यात आले. गाव सातपुडय़ाच्या दुर्गम भागात असल्यामुळे पंचनामा करण्यास अडथळे आले. दरम्यान, महिलेने मुलांसह आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत माका रेल्या पावरा यांच्या खबरीवरून धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार बोडके करीत आहे.
जुळ्या मुलांसह मातेचा गळफास
By admin | Updated: October 15, 2015 00:04 IST