नाक, तोंडाऐवजी हनुवटीवर आले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 07:11 PM2020-10-07T19:11:14+5:302020-10-07T19:12:24+5:30

अनेक जण विना मास्क, तर काहीजण मास्क चक्क हनुवटीवर परिधान करीत असल्याचे आठवडे बाजारात दिसून आले.

Mask on the nose, chin instead of mouth | नाक, तोंडाऐवजी हनुवटीवर आले मास्क

नाक, तोंडाऐवजी हनुवटीवर आले मास्क

Next
ठळक मुद्देसुरक्षेकडे दुर्लक्षहलगर्जीपणा नडतो म्हणून कोरोना वाढतोय, कोरोना योद्धाही बाधित

चंद्रमणी इंगळे
हरताळा : मुक्ताईनगर तालुक्यातील विविध ग्रामीण भागात कोरोना बाधित वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेक जण विना मास्क, तर काहीजण मास्क चक्क हनुवटीवर परिधान करीत असल्याचे आठवडे बाजारात दिसून आले.
प्रशासनाने थोडी मोकळीक दिली असता भाजी बाजारातील गर्दी, फिजिकल डिस्टन्ंिस्ांचा फज्जा उडवला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी रुग्ण वाढत आहेत. या आठवड्यातील सात-आठ दिवसातच हरताळा येथे डझनभर रुग्ण आढळले. त्यांनाही गृह विलगीकरण करण्यात आले आहे. त्यात कोरोना योद्धाही आहेत.
राज्य व केंद्र सरकारने थोडी मोकळीक दिल्यानंतर दुकाने, भाजीपाला विक्री सुरू झाली. सार्वजनिक वाहने सुरू झाली. यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सुरक्षित अंतर पालनाचे व मास्क वापरण्याची सूचनाही वारंवार सुरुवातीपासूनच देत आले आहे. तरीसुद्धा केवळ २५ टक्के नागरिक मास्क वापरतात. मला काही होणार नाही अशा आविभार्वात ते फिरताना दिसतात. हातगाडीवर भाजीपाला विक्रेत्यांच्या भोवती महिलावर्गदेखील गर्दी करतात. फेरीवाले वाढत असल्याने त्यांना कोणी हटकताना दिसत नाही. त्यात तरुण मंडळीही आहेत. अनेक तरुण दुचाकीवरून जाताना जणू कोरोना संपला असल्यासारखे वावरत आहेत. दुचाकीवर दोघे एकत्र फिरत आहेत. विना मास फिरणाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असले तरी नागरिकांनी स्वत:च्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी सतर्क होणे गरजेचे आहे. कोरोना अजूनही गेलेला नाही याचे भान ठेवावे. मात्र अनेक महाभाग संसर्गाकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे फिरत आहेत.
नागरिकांचा अशा बेफाम वागण्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. समूह-समूहाच्या बैठकांमुळे मोठ्यव संख्येने रुग्णात वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याची बाब चिंताजनक आहे.
दुकानावर नाक, तोंड किंवा चेहºयाऐवजी हनुवटीवर मास लावलेले असे अनेक ठिकााणी नागरी दिसून येत आहेत.
 

Web Title: Mask on the nose, chin instead of mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.