यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण, ता.यावल येथील प्रमिलाबाई दीपक पाटील या २९ वर्षीय विवाहितेने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.प्रमिलाबाई पाटील या महिलेने रात्री २ वाजेचा सुमारास माहेरी आईच्या घरात संतापाच्या भरात हे कृत्य केले. सकाळी आई-वडील प्रमिलाला उठविण्यासाठी गेले. तेव्हा तिने काहीतरी विषारी द्रव सेवन केला असल्याचे दिसून आले.पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी पोलिसांना खबर दिली. त्यावरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार युनूस तडवी करीत आहे.यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. तिच्या पश्चात पती, तीन मुले, आई, वडील आहेत. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 17:43 IST
थोरगव्हाण येथील प्रमिलाबाई दीपक पाटील या विवाहितेने आत्महत्या केली.
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देविवाहितेने स्वत:ला संपविले माहेरी विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही