अमळनेर : माहेरी आलेली विवाहित महिला टेलरकडे कपडे टाकून येते, असे सांगून आपल्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना १ रोजी शाहआलम नगरमध्ये घडली. नाजीमाबी शेख आबीद (२८) ही महिला २७ रोजी आपले सासूर एरंडोल येथून अमळनेर शाहआलम नगर येथे माहेरी आली होती. १ रोजी सकाळी ११ वाजता मुलगी शमीना शेख आबीद (८) व मुलगा असद शेख आबीद (५) यांना घेऊन मी टेलरकडे कपडे टाकून येते, असे सांगून निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती आली नाही म्हणून नातेवाइकांकडे तिचा शोध घेतला. अखेरीस तिचा भाऊ हारून खान नबी खान पठाण याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून हरवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शाहआलम नगरमधून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST