शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे ईदच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 13:06 IST

उत्साह

ठळक मुद्देशिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात खरेदीमहागाईचा काहीसा परिणाम

जळगाव : मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा रमजान ईद सण अवघ्या दोन दिवसांवर (१५ रोजी चंद्रदर्शन झाल्यास) आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध मार्केट व कॉलनींमध्ये गर्दी होत असून समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे.रमजान महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारात ईदच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी अनेकजण बाहेर पडल्याने बाजारपेठ फुलली आहे.शहराच्या अतिशय मध्यवर्ती आणि सर्व प्रकारच्या चीजवस्तू हमखास मिळणाऱ्या फुले मार्केट आणि परिसरात महिला, लहान मुलंमुलींची झुंबड उडत आहे. सर्व प्रकारची पादत्राणे, कपडे, बेन्टेक्स ज्वेलरी, अत्तर, सुरमा, घरगुती साºया वस्तू येथे मिळत असल्याने एकाच वेळी मनासारखी आणि हव्या त्या किमतीची वस्तू घेण्यासाठी ही लगबग वाढली आहे.रेडिमेड कपड्यांकडे कलयुवा पिढीचा कल तयार कपड्यांकडे आहे. शहरात अनेक नामवंत कंपन्यांची दालने (शोरुम) आहेत, ऐपतदार वर्ग त्याकडे वळत आहे. अर्थात ते खिशाला नाही परवडले तर पारंपरिक, व्यवसाय-उद्योगाला योग्य कपडे आपल्या टेलरकडून वाजवी दरात शिवणाºयांची संख्याही कमी नाही.शिरखुर्म्याचीही तयारीसामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव शिरखुर्मा तयार करून समाज बांधवांसह हिंदू बांधवांनाही आपुलकीने आमंत्रित करतात. या शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामध्ये सुक्यामेव्यासह शेवयांचीही मागणी वाढली आहे.महागाईचा काहीसा परिणामबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन खरेदी केली असली तरी अनेकजण हाताला आवर घालताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पावसाची दडी यामुळे हे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. एरव्ही प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान महिन्यात व ईदसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करतातच. त्यामुळे महागाई वाढत असली तरी रमजान सणासाठी खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.

 

 

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव