शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीचा खटला जलद न्यायालयात चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:05 IST

वाकडी ता. जामनेर येथे मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

जळगाव : वाकडी ता. जामनेर येथे मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर यासंदर्भातील खटला जलद न्यायालयात चालविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.या प्रकरणात आणखी एक पीडित मुलगा समोर आला आहे. या तीन पीडितांना प्रत्येकी एक लाखाची मदत आणि घरकुले देण्याचे आश्वासन मंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहे. मातंग समाजातील मुलांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढल्याप्रकरणी अजित तडवी (२०) व शकनुर तडवी (२३, रा़ वाकडी ता़ जामनेर) यांना शनिवारी अटक केली होती. त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात ईश्वर जोशी आणि प्रल्हाद लोहार यांना यापूर्वीच अटक झालेली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.>५ जुलैला महामोर्चाया घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जळगावात ५ जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. वाकडीतील पीडित कुटुंब या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही रविवारी वाकडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सोमवारी वाकडी येथे भेट देणार आहेत.