मुक्ताईनगर, जि.जळगाव : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी किशोरी बबन काकडे हिला श्रद्धांजली देण्यासाठी तालुका ग्रामीण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील प्रवर्तन चौकात रविवारी रात्री ७.३० वाजता कॅण्डल मार्च काढण्यात आला आणि शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील रहिवाशी व नगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात किशोरी अकरावीला सायन्स शाखेत शिकत होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी माझे बलिदान देत आहे, असे तिने म्हटल होते. आरक्षणअभावी दहावीत ८९ टक्के गुण मिळूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असूनही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला, अशी या भगिनींची खंत होतीरात्री ७.३० वाजता प्रवर्तन चौक येथून किशोरी बबन काकडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रवर्तन चौक येथून सुरू झालेला कॅण्डल मार्च प्रतिभा नगर, बसस्थानक, प्रवर्तन चौक येथे पोहोचला व येथे श्रद्धांजली सभा पार पडली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मराठा समाजबांधव उपस्थित होते.
मुक्ताईनगरला मराठा क्रांती मोर्चा कॅण्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:41 IST
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी किशोरी बबन काकडे हिला श्रद्धांजली देण्यासाठी तालुका ग्रामीण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील प्रवर्तन चौकात रविवारी रात्री ७.३० वाजता कॅण्डल मार्च काढण्यात आला आणि शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील रहिवाशी व नगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे ...
मुक्ताईनगरला मराठा क्रांती मोर्चा कॅण्डल मार्च
ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थिनीला वाहिली श्रद्धांजलीप्रवर्तन चौक येथून सुरू झाला कॅण्डल