शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षात केवळ दोन वेळा भरले मन्याड धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:07 IST

आडगाव,ता. चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत ...

ठळक मुद्दे मन्याड धरणाचा आलेख उतरताचारा व पाण्याचा प्रश्न बिकटगिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचा

आडगाव,ता.चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या सात वर्षात फक्त दोनदाच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे ही बाब परीसरातील शेतकºयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मन्याड परिसरात खरीप व रब्बीचे हंगाम चांगले होत असतात. मात्र गेल्या सात वर्षात परीसरातील शेतकरी दुष्काळीस्थितीत सापडल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांना शेतकºयांना मुकावे लागत आहे.चारा व पाण्याचा प्रश्न बिकटमन्याड परिसरातील बहुतेक विहीरींनी तळ गाठल्याने गुराढोरांसाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा विचार सध्या परीसरातील शेतकºयांना सतावत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने टंचाईची झळ कमी असली तरी उन्हाळ्यात कसे होईल याचा विचार आतापासूनच शेतकरी करीत आहेत.चाºयाअभावी कपाशी व बांडीचे वैरणशेतकºयांनी महागडा चारा मका, कडबा, सोयाबीनची कुट्टी साठवून ठेवली आहे. आगामी आठ ते दहा महिने चारा पुरवायचा म्हणून बहुतेक शेतकरी कपाशी उपटून एक वेळचे वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी कपाशीची कुट्टी करून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी शंभर रुपए शेकडा प्रमाणे उसाची बांडी विकत घेत आहेत.गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचामन्याड परिसरातील शेतकºयांसाठी मन्याड धरण व्यतिरीक्त कुठलेही जलस्रोत नाही. स्व.रामराव जिभाऊंनी मन्याड धरणाची निर्मिती केली. बेलगंगा साखर कारखान्याची निर्मिती केली. जिभाऊ नंतर एकही लोतप्रतिनिधींनी जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाही. गिरणा/मन्याड नदीजोड प्रकल्प हा राबवला असता तर आज मन्याड परिसराची परिस्थिती वेगळी असती.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव