शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळला मुलींचे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारणार- आय.जी. प्रतापराव दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:04 IST

मंगरूळ येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपीक विमा मंजूर असूनही मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रारउच्च पदावर जाण्यासाठी वाचनाची गरज

अमळनेर : सध्याची युवा पिढी हातात मोबाईल घेऊन पारावर बसून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा चुकतो यावर चर्चा करते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक अपयशी ठरतात. म्हणून ग्रामीण भागातील मुलींनीदेखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी मंगरूळ येथे मुलींचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी दिलीआय.जी डॉ.प्रतापराव दिघावकर हे जळगाव जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या तपासणीसाठी आले असता त्यांनी ११ रोजी मंगरूळ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळास सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयास ‛डॉ.अस्मिता प्रतापराव दिघावकरह्ण असे नाव देण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिघावकर पुढे म्हणाले, उच्च पदावर जाण्यासाठी पैशाची गरज नसते. वाचनाची आवश्यकता असते. मी फक्त १२०० रुपयात आय.जी. झालो आहे. सामान्य विद्यार्थी सतत दोन वर्षे अभ्यास करेल तर निश्चित यशस्वी होईल.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, ग. स.बँकेचे माजी चेअरमन झाम्बर राजाराम पाटील, संस्थेचे अध्यक्ष युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, सुहासिनी पाटील उपस्थित होते.यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, काँग्रेसचे तालुका प्रभारी बी. के. सूर्यवंशी यांनी काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही विमा मिळत नसल्याची तक्रार केली.माजी आमदार पाटील यांनीदेखील एका युवकाची बुडीत रक्कम मिळण्याविषयी तक्रार केली.किरण पवार यांनी मठगवाण येथील सरपंचावरील अन्यायाबाबत तक्रार केली. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष शकील काझी, नगरसेवक प्रताप शिंपी, पातोंडयाचे महेंद्र पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे, मुन्ना पवार, गोविंदा बाविस्कर, पोलीस पाटील, भागवत पाटील, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, विश्वास पाटील, योगेश पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, एस. बी. पाटील, श्रुती पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण, प्रवीण पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील, योगेश जाधव, सुदर्शन पवार, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.