आॅनलाईन लोकमतवरणगाव,दि.२४ : आशिया महामार्ग ४६ वरील नागराणी पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पंपावरील व्यवस्थापक प्रभाकर खंडारे जखमी झाले. दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये लांबवून पलायन केले.शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी तीन दरोडेखोर भुसावळ ते मुक्ताईनगर आशिया महामार्गावरील भुसावळचे भाजपा नगरसेवक रमेश नागराणी यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर आले. त्यांनी पेट्रोल भरुन थेट व्यवस्थापकाच्या दालनात घुसून पैशांची मागणी केली. व्यवस्थापक प्रभाकर निनाजी खंडारे यांनी गल्ल्यातील रोकड देण्यास विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने व्यवस्थापक खंडारे यांच्या डोक्याला पिस्तुल लावून धमकावत रोकड मागितली. व्यवस्थापक विरोध करीत असल्याने दुसºया दरोडेखोराने लोखंडी रॉडचा वार खंडारे यांच्या डोक्यात केला. खंडारे जखमी होताच दरोडेखोरांनी रोकड लांबवीत व्यवस्थापकाच्या दालनावरील सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्हीचे मशीन सोबत घेत सामनानाची नासधूस केली.दरोडेखोर दुचाकीवरुन मुक्ताईनगरकडे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, पोलीस कर्मचारी, मुक्ताईनगर विभागाचे उपअधीक्षक सुभाष नेवे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुºहाडे घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. खंडारे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
भुसावळ जवळील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड्यात व्यवस्थापक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:11 IST
पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने येत टाकला दरोडा
भुसावळ जवळील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड्यात व्यवस्थापक गंभीर जखमी
ठळक मुद्देनागराणी पेट्रोल पंपावर टाकला दरोडेखोरांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पंपावरील व्यवस्थापक प्रभाकर खंडारे जखमीदरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्हीचे मशीन सोबत घेत सामनानाची केली नासधूस