शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मनाबी पो:या एक दिन कलेक्टर हुई..

By admin | Updated: May 14, 2017 16:44 IST

कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला जिल्हाधिकारी बनविले

विशाल गांगुर्डे / ऑनलाइन लोकमतपिंपळनेर, जि. धुळे, दि. 14 -  सामोडे गावातील आदिवासी समाजाचा पहिले जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुडे (सध्या नेमणूक नांदेड) यांच्या आईने कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला जिल्हाधिकारी बनविले. आदिवासी भिलाटीमध्ये दारू विकूनही मुलाला ‘कलेक्टर’ बनविण्याच्या जिद्दीने पेटलेल्या या कर्तृत्ववान माता कमलबाई भारूडे व मुलाची ही कहानी.. पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय.. मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी मोठमायच्या घराकडे धावत सुटलो.. मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाटय़ात सापडणं होतं, हे त्यावेळी माङया बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण या दोघीही माङयाकडे जराही ढुंकूनही न पाहता घरी निघून गेल्या.धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा. याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या. माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक म्हैस असा आमचा कुटुंबकबिला. आमच्या भिलाटीमध्ये शिक्षण, शाळा याचा कित्येक वर्षे कुणाचाही दुरान्वये संबंध आला नव्हता. चुकून कधीतरी एखादा मुलगा फाटका सदरा आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मध्येच कळपातून चुकलेल्या वासरासारखा शाळेत जाताना दिसे, पण तेवढाच.. त्यानंतर पुन्हा ये रे माङया मागल्या. अशा परिस्थितीत मोठमाय आणि मायने शाळेत माङो नाव घातले. तिथेच माङया आयुष्याच्या बदलाला सुरुवात झाली. मावशी आणि आई निरक्षर असली तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले होते. कदाचित त्याचमुळे मला शाळेत पाठवण्याचा अट्टहास होता.पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारी आम्ही भिल्ल समाजातील माणसं.. पोट नेईल तिथं जायचो. असेच आमचे पूर्वज कधीतरी सामोडय़ामध्ये येऊन स्थिरावले. काही भिल्लांची स्वत:च्या मालकीची जमीन असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे शेवटी मजुरीसाठी परप्रांतात जावंच लागत असे. बहुतेककरून आमच्या खान्देशातील भिल्ल गुजरातेत जात असत. बहुसंख्यांकडे ना स्वत:चा व्यवसाय ना शेतजमीन; रानावनात राहणारे आम्ही, मासे पकडणे अथवा दारू गाळणे हा व्यवसाय करीत असू. घरातील लहान-थोर सर्वच दारू पीत. त्यामुळे दारू हे व्यसन वाईट असून ते करू नये, असे सांगणारे घरात कुणीच नाही. अशा वातावरणात मी वाढलो. मी आईच्या पोटात असतानाच वडील गेले. गर्भपात करून घेण्यासाठी प्रचंड दबाव असताना माङया आईच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणा-या मावशीने आईला आणि माङया दोन्ही भावंडांना तिच्या घरी आणले. आमच्या सामोडय़ामध्ये देखील अभिजनांची शाहूवस्ती होती. तेथील मुले शाळेत जात. माझी शाळेमधली प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये मला गती होती. आता शाळेतील शिक्षक घरी येऊन माझी प्रगती सांगत होते. मी प्रगती करतो म्हणजे काय, हे जरी कळत नसलं तरी मी काही तरी चांगलं करतोय आणि म्हणूनच शाळेतले शिक्षक घरी येताहेत, इतकंच मायला आणि मोठमायला कळत होतं. मी दहावीत असतानाच, माङया ब:याचशा मित्रांची लग्नं झाली होती. म्हणजे पंधरा-सोळाव्या वर्षीच माङया मित्रांची लग्नं होऊन ते भिलाटीतील इतरांसारखे मजुरीवर जात होते. शाळा शिकाऊन पो-याला कोठे नोकरी लागाऊ शे? घर राही त पैसा तरी कमाई, असा साधारण सगळ्यांचा सूर होता. खरे तर त्या पालकांचे म्हणणे बरोबर होते. कारण गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावणे, ही त्या क्षणाची गरज होती.अगदी माङया मामा, काका यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. या सर्वांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे; तर अज्ञान होतं, असंच मला वाटतं. कदाचित हेच आमच्या मायला आणि मोठमायला कळलं होतं आणि म्हणूनच गावातल्या शाळेतून नंतर मला नवोदय या अक्कलकुव्याच्या शाळेत शिक्षकाच्या आग्रहाखातर पाठवले. माङया आयुष्यात सुदैवाने चांगली माणसे आली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा, असं मनात होतं. कारण गणितामध्ये चांगले मार्क मिळत होते. परंतु इंजिनिअर झालास तर केवळ तुझा आणि तुङया कुटुंबियांचाच फायदा होईल; आणि डॉक्टर झालास तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. शिवाय डॉक्टर झाल्यानंतर प्रशासक झालास तर अधिक व्यापक प्रमाणात लोकसेवा करता येईल, हे माङया देवरे सरांनी समजावून सांगितले.. जी. एस. मेडिकलसारख्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. सामोडय़ातील नवोदयसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये कधी जातीवरून माझी क्षमता जोखली गेली नव्हती. मात्र मुंबईसारख्या आधुनिक विचारांच्या शहरामध्ये असा अनुभव आला. खरे तर मला त्यांची कीव वाटली होती. पण या गोष्टी उराशी कवटाळून, मला माझी प्रगती रोखायची नव्हती. सामोडय़ातून ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेला एक आदिवासी मुलगा उत्तम गुणांनी डॉक्टर झाला होता. ज्या केईएममध्ये सुरुवातीला तुच्छतेची वागणूक मिळाली होती, त्याच केईएममध्ये ‘बेस्ट स्टुडंट अवॉर्ड’ मिळवून मी स्वत:ला सिद्ध केले. त्या वेळच्या मुलाखती दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन समाजाची सेवा करणार असल्याचे मी सांगितले होते. पहिल्या प्रय}ात माझी ‘इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिस’साठी निवड झाली होती; परंतु आयएएस बनण्याचे ध्येय पक्के असल्याने मी पुन्हा एकदा प्रय} करून 2012 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आणि अखेर आयएएस झालो.. एक ध्येय गाठले..आयुष्य एका नव्या वळणावर उभे असताना मला लहानपणी घडलेला  प्रसंग आठवतोय.. भिलाटीमध्ये आमच्या घरी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही आमचा दारू विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असू. गावातील लोक दारू पिण्यासाठी घरीच येत असत. ब:याच वेळेस आम्हा लहान मुलांना त्यांना चखणा वगैरे आणून द्यावे लागत असे.माझी परीक्षा असली की साहजिकच मी ही कामं करायला तयार होत नसे, यावरून आमच्या एका गि:हाइकाने, तो:यात ‘जाय थोडं काम करीये, शिकसीन मोठा डाक्टर-कलेक्टर व्हनार शे’ असं हिणवून मला चखणा आणायला सांगितले. मी रडू लागलो, तेव्हा आईने त्या गि:हाइकाला सांगितले, ‘मना बी पो:या एक दिन डाक्टर-कलेक्टर हुई. तुम्ही चखणा आज दुस:या कडतीनं मांगडा, आनी याले अभ्यास करू द्या!मना बी पोरा एक दिन कलेक्टर हुई..स्वामी तिन्हीं जगाचा, आई विना भिकारी’‘स्वामी तिन्हीं जगाचा, आई विना भिकारी’. आईचे महात्म्य आपण कधीही शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्या माता-पित्यामुळे आपल्या ही सुंदर सृष्टी पहायला मिळाली, त्यांचे उपकरांची परतफेड आपण काहीही केल्या चुकवू शकत नाही. जगात आपला हेवा करणारे भरपूर भेटतील. आपली प्रगती पाहून जळणारेही भरपूर जण भेटतील, परंतु जगात दोनच अशा व्यक्ती आहेत की, ज्यांना तुमची प्रगती पाहून आनंद होईल. ते म्हणजे आई आणि वडिल. त्यांच्या प्रेमामध्ये कधीही स्वार्थ नसतो. परमेश्वर सर्व ठिकाणी आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली आहे. गरीब असो वा श्रीमंत मुलांना मोठे झालेले पाहणे, हे प्रत्येकच आई-वडिलांची हौस असते. स्वत:ला चांगले कपडे घेणार नाही, कधी स्वत:ला चांगले खाणार नाहीत, परंतु मुलांसाठी मात्र रात्रं-दिवस झडणारे आई-वडिल आपण नेहमी पाहतो. म्हणून म्हणतात, ‘आई एक नाव असतं, आणि घरातील घरात गजबजलेलं गाव असतं’. सुशिक्षित असो किंवा अशिक्षित ज्यांच्या संस्काराच्या शिदोरीवर मुले मोठी होतात, त्या आई-वडिलांप्रती ‘मातृ दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या मातृदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या आई विषयी प्रकट केलेल्या भावना..