शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:10 IST

ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे

ममुराबाद, ता. जळगाव : तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठ्याचा वीजपंप वारंवार जळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांना नेहमीच टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.नांद्रा खुर्द येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच वीज वाहक तार जळाल्याने व पंप नादुरुस्त झाल्यामुळे पंपिंग ठप्प होण्याचे प्रकार कायम सुरू असतात. आताही तोच अनुभव येत आहे. ४५ अश्वशक्तीचे तीन पंप लागोपाठ जळाल्यानंतर ममुराबादचे पाणीपुरवठा पूर्णत: थांबला आहे. विशेष म्हणजे नादुरुस्त पंप लगेच दुरुस्त केला जात नसल्याने तापी नदीवर एक पंप नादुरुस्त झाल्यावर दुसरा पंप लगेच जोडणे अशल्य होते.पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गावात पाण्याचा थेंबही येत नसल्याने ममुराबादच्या ग्रामस्थांना बऱ्याचवेळा गावातील ट्यूबवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु सर्व ट्यूबवेलचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नसते. मात्र, नाईलाज म्हणून ग्रामस्थांना या पाण्याचा वापर करावा लागतो. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून तशी तक्रारही ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव