शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बालक खून प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:53 IST

घातपात: बुवा- बाबा, मांत्रिकांचीही पोलीसांनी केली चौकशी

भङगाव - येथील ९ वर्षीय ईसम बब्बू सय्यद या बालकाची अनैसर्गिक कृत्यातून अमानुषपणे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे स्केच (रेखाचित्र) पोलीस तपास अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले आहे. या आधारे लवकरच या खुन्याला जेरबंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली ईसम बब्बु सय्यद या इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्याचे २१ रोजी अपहरण झाले होते. २२ रोजी त्याचा मृतदेह येथील देशमुख महाविद्यालयाच्या मागील केळी बागेत मिळून आला होता. तेव्हा पासून खुन्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या खूना नंतर एकाच आठवड्यात इसमच्या आई-वडिलांनी मुलीसह न्याय मिळण्यासाठी सामाजिक व मानसिक त्रासातून फाशी घेतली. त्यांच्या जवळून ३ सुसाईड नोट मिळून आल्या होत्या. या सामूहिक फाशीच्या गुन्ह्यात दोन जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. सद्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इसमच्या मारेकऱ्यांचा पोलीस युद्धपातळीवर तपास करीत आहेत. त्यासाठी पोलिस महानिरीक्षक छेरिंग व पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ७ तपास पथक नेमण्यात आली आहे . या पथकानी भडगावात तळ ठोकून शेकडो संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताचे स्केच बनविले आहे .चिमुकल्या इसमचा निर्घुन खुन खुन कशामुळे झाला? या परीवाराच्या संपर्कात कोण कोण होते? आदीबाबत पोलीस पथकांमार्फत कसून चौकशी होत आहे. काही बुवा- बाबा, मांत्रिकांचीही पोलीसांनी चौकशी केली आहे. पोलीस पथकांनी सर्व दिशेने तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना काही गुप्त माहीती मिळाली असुन त्या दिशेनेही पोलीस कसोसीने तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी