शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सातत्य कायम राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:24 IST

कार्यतत्परतेसह शिस्तीचा बडगा हवाच

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी गेल्या महिन्यात कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. कामामधील गतीमानता आणि शिस्तीचा बडगा असा प्रभाव त्यांचा पडत आहे. नक्कीच जिल्हा परिषदेच्यादृष्टीने ही प्रशंसनीय बाब आहे, कामाची हीच पद्धत कायम राहिल्यास जिल्हा परिषदेचा कारभार आधिकाधिक चांगला होवू शकतो.डॉ.बी. एन. पाटील हे जळगाव येथे रुजू झाल्यापासून याच पद्धतीने काम करीत असून त्यांनी सुरुवातीलाच विविध विभागाची अचानक हजेरी घेत अनेकांना नोटीस देत आपला दबदबा निर्माण केला. तसेच नेहमीच याप्रकारे अचानक तपासणी करण्याच्या सूचना प्रशासन विभागाला दिल्या आहेत. ही जबाबदारी प्रशासन विभागानेही पार पाडणे गरजेचे आहे.याचबरोबर ही जबाबदारी पार पाडली जात आहे की, नाही ?हे देखील पाहिले गेले पाहिजे. अन्यथा एकदा कारवाई झाली की पुन्हा अनेक महिने हा विषय कोणाच्याही स्मरणात राहत नाही व कर्मचाऱ्यांन हेच फावते.अर्थातच बºयाचदा एखादा अधिकारी नव्याने कारभार स्विकारल्यावर कार्यतत्परता दाखवत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मात्र काही दिवस गेल्यानंतर ही कार्यत्परता दिसून येत नाही, असे मात्र होवू नये.दरम्यान १०० टक्के अतिक्रमणे काही दिवसातच नियमीत करण्याचे डॉ.पाटील यांचे काम देखील उल्लेखनीय असून इतक्यात पाचोरा पंचायत समितीच्या पाच अभियंत्यांना गैरहजेरीच्या कारणावरुन निलंबित केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी खळबळ उडवून दिली आहे.त्यांचा हा कामाचा धडका आणि शिस्तीचा दरारा कायम दिसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.