लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने शहरातील दोन केंद्र वगळता शुक्रवारी अन्य शासकीय सर्व केंद्र बंद राहणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी कोविशिल्ड लसीचे ३० ते ४० हजार डोस प्राप्त होण्याची शक्यता असून, शनिवारी ते केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात कोविशिल्ड लस नसल्याने कोव्हॅक्सिन उपलब्ध असलेले चेतनदास मेहता व रोटरी भवन हे दोनच केंद्र सुरू होते. गुरुवारीही लस प्राप्त न झाल्याने शुक्रवारीही केवळ हे दोनच केंद्र सुरू राहणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव शहराला एकत्रित १० हजार लसींचे डोस देण्यात आले होते. आरोग्य केंद्रांना लस मिळाली नव्हती, त्यामुळे आताच्या साठ्यामध्ये आरोग्य केंद्रांना अधिक डोस जाण्याची शक्यता आहे.