अमळनेर : राजपूत एकता मंचतर्फे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती शासकीय नियम पाळून साजरी करण्यात आली. धुळे रोडवरील महाराणा प्रताप चौकातील स्मारकावर मोजक्या समाजबांधवांनी व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, राजपूत समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रणजीत भीमसिंग पाटील, चंदूसिंग परदेशी, नरेंद्रसिंग ठाकूर, अनिल भीमसिंग पाटील, ॲड. दीपेन परमार, चेतन राजपूत, राजूसिंग परदेशी, प्रकाश भीमसिंग पाटील, भरतसिंग पाटील, विलास पाटील, गुलाबसिंग पाटील, जयराम पाटील, जयदीप राजपूत, सूरजसिंग परदेशी, मुकेश परदेशी, कोमल राजपूत, योगेश राजपूत, प्रणवसिंग राजपूत, तेजस ठाकूर, हर्षल ठाकूर, सावन राजपूत, कुलदीप पाटील, गोविंदा पाटील, अरुण पाटील, जयदीप पाटील यासह समाजबांधव व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने राजपूत व परदेशी समाजाला सामाजिक व सेवेच्या उद्देशाने अमळनेर न.प.चा खुला भूखंड दिल्याने, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांचे आभार मानले.