शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

महा जनादेश यात्रा रथावर बोदवडला खडसेंना घेतले सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:28 IST

  बोदवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बोदवड शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता नागरिकांनी ...

 

बोदवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बोदवड शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता नागरिकांनी भव्य स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार एकनराथराव खडसे, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर हे होते.यात्रा भुसावळ येथून येत बोदवड तालुक्यातील विचवा गावापासून भांनखेडा, साळशिंगीमार्गे बोदवड शहरात दाखल झाली. पूर्ण जिल्ह्यात खडसे मुख्यमंत्र्यांसमवेत यात्रा रथावर कोठेही नव्हते मात्र बोदवड येथे त्यांच्या मतदारसंघात या रथावर स्वार होण्याची संधी लाभली. यावेळी खडसे म्हणाले की, दुष्काळग्रस्त बोदवड तालुक्यातील ओडिए पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी ४८ कोटीचा निधी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्नयात्रा मलकापूर कडे मार्गस्थ होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाणी टंचाईचे निवेदन दिले, तर पुढे मलकापूर चौफुलीवर सागर पाटील या कार्यकर्त्यांने याच प्रश्नी जनादेश यात्रेला काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाव घेऊन या युवकास अगोदरच ताब्यात घेतले.