ऑनलाईन लोकमतहिंगोणा जि. जळगाव, दि.25 - शेतात रखवाली करणा:या आदिवासी कुटुंबावर अज्ञातांनी सशस्त्र हल्ला केला. यात प}ी ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे यावल तालुक्यातील हिंगोणे-मारुळ रस्त्यावरील एका शेतात घडली. या घटनेने खळबळ उडाली असून हल्ल्याचे कारण मात्र समजू शकले नाही. हिंगोणा -मारुळ शिवारात जियाउलहक इबादत अली यांच्या शेतात बारेला कुटुंब रखवाली करण्यासाठी वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री आठ वाजेनंतर दुर्गेश बारेला (30) व त्याची प}ी मंगला (22) हे पती-पत्नी व त्यांचा लहान मुलगा अंगणात झोपले होते. या दरम्यान अज्ञातांनी या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याने मंगला ही जागीच ठार झाली तर दुर्गेश याच्या मानेवर जबर वार केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला यावल ग्रामीण व नंतर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मंगला हिचे शव विच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले होते, मात्र ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्याने तिचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या हल्ल्यातून या दाम्पत्याचा चिमुकला बचावला आहे.दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यातील श्वानाने हिंगोणा मारुळ शेती शिवारात शोध घेतला, परंतु काहीही हाती लागले नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकुंभे करीत आहेत.
मारूळ येथे आदिवासी कुटुंबावर सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:55 IST
मारुळ येथील रात्रीचा थरारात पत्नी ठार, पती गंभीर जखमी, चिमुकला बचावला
मारूळ येथे आदिवासी कुटुंबावर सशस्त्र हल्ला
ठळक मुद्देसोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी केला हल्लाअज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार तर पतीच्या मानेवार वारया हल्ल्यात बारेला दाम्पत्याचा चिमुकला बचावलाश्वान पथकाने दाखविला हिंगोणा मारूळ परिसरार्पयत मार्ग