शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तत्वनिष्ठ गुरुसाठी एकनिष्ठपणा आवश्यक - दादा महाराज जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:00 IST

जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांच्या सत्कार

जळगाव : जो पर्यंत मातृ-पितृ सेवा होत नाही तोपर्यंत गुरु तत्व संभाळता येत नाही आणि तत्वनिष्ठ गुरु हा एकनिष्ठ असल्याशिवाय मिळत नाही, असा सल्ला चिमुकले श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी दिला.गुरुपौर्णिमेनिमित्त कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी दुपारी आयएमए सभागृहात ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञता पूर्वक गौरव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी दादा महाराज जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. व्यासपीठावर दादा महाराज जोशी यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार, सत्कारार्थी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील व बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र पाटील उपस्थित होते.प्रारंभी दीपप्रज्वलन, धन्वंतरी पुजन झाले. वैद्य योगेंद्र कासट यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. परिचय वैद्य अमित चौधरी यांनी करुन दिला.सत्कारमूर्ती डॉ.उल्हास पाटील व डॉ.राजेंद्र पाटील यांना दादा महाराज जोशी यांना ह.भ.प.दादा महाराज जोशी यांच्याहस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य हेमंत बाविस्कर आणि एन.डी.पाटील, आरती पाटील, प्रीती गुजराथी आदींचा सत्कार करण्यात आला.गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करणारीभारतीय संस्कृती मातृशक्तीवर आधारीत असून गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करते असे ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी नमूद केले. प्रतिष्ठानतर्फे डॉक्टरांविषयी कृतज्ञता म्हणजे वंदन करण्याचे कार्य आहे. कारण सत्कारमूर्ती म्हणजे मूर्तीत देवत्व असते आणि डॉक्टर म्हणजे धन्वंतरी अर्थात विष्णूचे रुपच आहे. स्वकर्तृत्व सर्वश्रेष्ठ असते. अशा कर्तृत्ववान डॉक्टरांचा गुरुपौणिमेला सत्कार करणे ही आदर्श गुरु परंपरा असून ती माणसाला निर्भय बनविते असेही ते म्हणाले.राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगलीसत्काराला उत्तर देताना डॉ.उल्हास पाटील यांनी शिक्षणापासून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना असा प्रवास सांगितला. पुरुष डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करण्यास डॉ.अविनाश आचार्य यांच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाले असे सांगून ही परंपरा येथील दिग्गज डॉक्टरांनी पुढे नेल्याचेही त्यांनी नमीद केले. बरे झाले ते राजकारणार नव्हते, असाही उल्लेख त्यांनी करताच हशा पिकला. राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगली आहे, असेही ते म्हणाले.यशात गुरुंचा मोठा वाटाडॉ.राजेंद्र पाटील यांनी वडीलच शिक्षक असल्यामुळे घरी आणि शाळेत तेच गुरु तसेच घर म्हणजेच गुरुकुल झाल्याने चांगले संस्कार झाले. जे चांगले झाले, यश मिळाले त्यात गुरुंचा मोठा वाटा असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपूत्रे यांनी केले तर वैद्य जयंत जहागिरदार यांनी आभार मानले. माधुरी जहागिरदार व मधुरा जहागिरदार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव