शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

खरीप पीककर्ज वाटपाचा निच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:37 PM

जेमतेम ३३ टक्के कर्जवाटप

ठळक मुद्दे मागील वर्षीच्या तुलनेत निम्मेच कर्जवाटप इतर बँकांनी आदेश डावलले

जळगाव: खरीप पीक कर्जवाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याने पीककर्ज वाटपाचा यंदाच्या वर्षी निच्चांक गाठला आहे. खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असून ही मुदत संपण्यास जेमतेम ४ दिवस उरले असताना उद्दीष्टाच्या जेमतेम ३३ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. याउलट मागील वर्षी खरीपासाठी ५७.०६ टक्के कर्जवाटप झाले होते.२०१८-१९ या वर्षात शेतकऱ्यांना २९४४ कोटींचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आलेले होते. मात्र कर्जमाफीच्या घोळ लांबल्याने शेतकरी कर्जमुक्त होऊ न शकल्याने बँकांनी त्यांना थकबाकीदार ठरवत पीककर्ज देणे टाळले. तर जिल्हा बँकेने पात्र ठरलेल्या शेतकºयांनाही पन्नास टक्केच कर्जवाटपाचे धोरण जाहीर करून टाकले. तर राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी कर्जवाटपाकडे सोयीस्कर पाठ फिरवली. त्यामुळे १ लाख ६८ हजार २६० खातेदारांना ९७० कोटी ८२ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ ३३ टक्केच खरीप पीककर्जाचे वाटप झाले आहे.जिल्हा बँकेकडून ५३ टक्के कर्जवाटपजिल्हा बँकेला खरीपासाठी ८१३ कोटी ८७ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने १ लाख ३७ हजार २०९ खातेदारांना ४२७ कोटी ४७ लाखांचेच पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या सुमारे ५३ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे.इतर बँकांनी आदेश डावललेराष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी तर शासनाचे पीककर्ज वाटपाचे आदेश धाब्यावर बसविल्याचेच चित्र दिसून येत आहे. राष्टÑीयकृत बँकांना खरीपाचे १७२४ कोटी २६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी २५ हजार ६१७ श्ोतकºयांना ४४० कोटी ३५ लाखांचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर खाजगी बँकांना ३५६ कोटी ३६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी ४६५० खातेदारांना ९४ कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजे उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकांनी उद्दीष्टाच्या ३३ टक्के कर्जवाटप केले आहे.