शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२० शाळांमध्ये आढळले निकृष्ट दर्जाचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:02 IST

‘त्या’ विषबाधेच्या घटनेप्रकरणी जि. प. सीईओंकडे अहवाल सादर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या कन्हाळे येथील शाळेमध्ये ९ विद्यार्थ्यांना भोजनातून झालेल्या विषबाधा प्रकरणी, नेमलेल्या चौकशी समितीने गुरुवारी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.२२ जुलै रोजी भुसावळ तालुक्यातील कन्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी कन्हाळे शाळेत जाऊन, तेथील शालेय पोषण अहाराची तपासणी केली होती. यावेळी त्यांना शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे व तांदूळामध्ये अळ््या असल्याचे आढळून आले होते. यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे निकृष्ट पोषण आहारातील धान्याचे नमुने आणून, ठेकेदार आणि पोषण आहार अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.तसेच शिक्षण समितीच्या बैठकीत सुद्धा पल्लवी सावकारे यांनी निकृष्ट पोषण आहाराची तक्रार केल्यावर, शिक्षण सभापती पोपट भोळे तातडीने नेमून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमलेल्या चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ४२ शाळामधील धान्याची तपासणी केली.४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये आढळले निकृष्ठ दर्जाचे धान्यशिक्षण सभापतींनी नेमलेल्या चौकशी समितीतील अधिकाºयांनी भुसावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील धान्यांची तपासणी करुन, धान्याचे नमुने घेतले. या नमुन्याचा अहवाल गुरुवारी या समितीच्या सदस्यांनी संजय मस्कर यांच्याकडे सोपविला आहे. यामध्ये ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य आढळून आले आहे. या प्रकरणी आता पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तक्रारीनुसार कुणावर कारवाई करतात. याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव