शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगलाचे शव पाण्याच्या खड्ड्यात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 17:38 IST

वीटभट्टीलगत पाण्याच्या १५ फूट खोल खड्ड्यात शुक्रवारी सकाळी प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळले.

ठळक मुद्देपाळधी येथील घटनादुचाकीवरून जाताना घसरली असल्याचा अंदाज

पथराड/पाळधी, ता.धरणगाव, जि.जळगाव : पाळधी येथील वीटभट्टीलगत पाण्याच्या १५ फूट खोल खड्ड्यात शुक्रवारी सकाळी प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळले. खड्ड्याजवळून जाताना दुचाकी पाण्यात घसरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. प्रिया दत्तात्रय पाटील (वय १७, रा.पाळधी, ता.धरणगाव) आणि जयेश दत्तात्रय पाटील (वय १९, रा.नशिराबाद, ता.जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.पाळधी येथे चांदसर रोडलगत अनिल कासट यांच्या वीटभट्टीलगत खोल खड्ड्यातील पाण्यात प्रेमीयुगलाचे शव तरंगताना वीटभट्टी कामगार अर्जुनसिंग बारेला यास आढळले. वीटभट्टीमालक अनिल कासट यांनी पाळधी पोलिसांना कळविले. पाळधी पोलीस स्टेशनचे सपोनि हनुमंत गायकवाड व सहकारी घटनास्थळी पोहोचले व ही माहिती प्रभारी स.पो.नि.पवन देसले यांना देण्यात आली.पाळधी पोलिसांनी दोघे शव व सोबत दुचाकी पाण्यातून बाहेर काढल्यावर गावातील लोकांनी मुलीला ओळखले. पोलिसांनी दोघांच्या आईवडिलांना ही माहिती दिली व शव जळगाव येथे शवविच्छेदनासाठी रवाना केले.सूत्रांनुसार, पाळधी येथील मुलगी २ आॅक्टोबर रोजी बेपत्ता होती. शोधाशोध केल्यावर मिळाली नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी ३ रोजी पाळधी पोलिसात मुलीला कोणीतरी फुस लावून घेऊन गेल्याची तक्रार दिली होती.दरम्यान, मुलीचे नाव प्रिया दत्तात्रय पाटील (वय १७, रा.पाळधी, ता.धरणगाव) असून, मुलाचे नाव जयेश दत्तात्रय पाटील (वय १९, रा.नशिराबाद, ता.जळगाव) आहे. त्यांचे प्रेमसंबंध होते. जयेश हा २ रोजी जळगाव येथून मित्राची दुचाकी घेऊन पाळधी येथे आला. मुलीने जळगावला कॉलेज जात असल्याचे सांगितले व मुलासोबत पाळधी परिसरात फिरत राहिली. वीटभट्टी बंद असल्याने या परिसरात कोणीच जात नाही. हे दोघे तेथेच भेटत असल्याचा कयास लावला जात आहे. पाण्याच्या खड्ड्याजवळून दुचाकी घेऊन जात असताना गाडीचा तोल गेल्याने दोघे खड्ड्यात पडले व मयत झाले असावेत, असा अंदाज लावला जात आहे. याबाबत पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पवन देसले व हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अरून निकुंम, सुमित बोरसे, विजय चौधरी, नीलिमा हिवराळे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूDharangaonधरणगाव