शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कमळाच्या फुलांनी हरताळ्याचा तलाव बनलाय नयनरम्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

वीस वर्षांपूर्वी संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी व्यापला होता. संपूर्ण १७५ हेक्टर ५६ आर. जलसाठा असलेल्या तलावात कमळ ...

वीस वर्षांपूर्वी संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी व्यापला होता. संपूर्ण १७५ हेक्टर ५६ आर. जलसाठा असलेल्या तलावात कमळ शेती करण्यात येत होती. काही ठेकेदारांनी त्यावर चांगलाच डल्ला मारत कमाई केली. परप्रांतात येथून कमळाच्या वाट्या आयशर, छोटा हत्ती आदी वाहनांतून भरून पाठवण्यात येत होत्या. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये कमी पावसामुळे तलावात पाणी साचत नसल्याने संपूर्ण तलाव हा ठणठणाट होता आणि त्यातही कमळ संपूर्ण नष्ट झाले होते. परंतु आता येथील बेहर बेटमध्ये बांधण्यात आलेल्या साई मंदिर परिसरात कमळाने पुन्हा डोकं वर करीत जवळपास दोन खड्याच्या जागेपर्यंत आपला अधिवास सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनादेखील कमळाच्या फुलाचे सौंदर्य पाहून भुरळ पडत आहे. पूर्वी येथे कमळ असताना २००३मध्ये श्रावण बाळ समाधी मंदिर जीर्णोद्धार करण्याच्या वेळेस करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी या तलावाचे नामकरणदेखील लक्ष्मीसागर असे केले होते.

ग्रामस्थांना मात्र येथे कमळ नकोच

कमळाची फुले आकर्षक व मोहक वाटत असली तरी ठराविक मर्यादेपुरते ठीक आहे. मात्र संपूर्ण तलावात ते वाढल्यास त्याचा धोका मात्र या तलावाला आहे. त्यातून कोणतेच उत्पन्न गावकऱ्यांना मिळत नाही. पूर्वी कमळावर अनेकांनी खूप पैसा कमावला. कमळ शेतीमुळे मत्स्य व्यवसायावर उपासमारीची वेळ येते. केवळ देखावा म्हणून विशिष्ट भागापुरता त्याची वाढ होणे शक्य आहे. परंतु संपूर्ण तलाव भरून येथे कमळ उगवायला नकोच. त्यामुळे तलावाचे पाणी सर्व दूषित होऊन निरुपयोगी ठरत असल्यामुळे असे मंदिर सेवेकरी मधुकर भगत, गजानन ठाकूर, माजी सरपंच जयेश कार्ले, जितेंद्र वाघ व अन्य ग्रामस्थांचे मत आहे.

तलावात बोटिंगसाठी कमळ व्यतिरिक्त पाणीसाठा जिवंत असला पाहिजे. पर्यटनाला चालना मिळेल. तलाव सुशोभीकरण यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागच्या वेळेस प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. पर्यटकांसाठी आकर्षक ठरते, पण कमळ मर्यादेतच असले पाहिजे.

-भागवत धबाडे, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मुक्ताईनगर

मोजक्याच जागी कमळ उगवले पाहिजे. कारण मासेमारी करताना अडचणी निर्माण होतात, पाणीही दूषित होते. पूर्ण तलावात कमळ वाढू देऊ नये. मत्स्यमारीवरच गावाची उपजीविका अवलंबून आहे. तलावाचा फायदा गावकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

-समाधान कोळी, मासेमारी मजूर

===Photopath===

010621\01jal_21_01062021_12.jpg

===Caption===

हरताळे पुरातन ऐतिहासिक तलावात कमळाची फुले पुन्हा उमललेली आहेत.येथील साई मंदिर परिसरात चा भाग नयनरम्य दिसत पासून त्यामुळे तलावाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.