शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेलं पत्र, सावित्रीच्या लेकींना गवसलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:18 IST

गुरुंमुळे जडला भडगावातील कन्याशाळेच्या विद्यार्थिनींना लेखनाचा छंद

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : माझ्या मामाचं पत्र हरवलं.. म्हणत पहिली-दुसरीत असतांना खेळला जाणारा हा एक आबा-धोबी चा खेळ. खेळातील हे पत्र प्रत्यक्ष जीवनातुन देखील हरवत चाललेय, दोन टोकास जोडणारे संवादाचे हे प्रभावी माध्यम आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही टिकवून ठेवण्यासाठी भडगावातील कन्या विद्यालयाचे एक शिक्षक सुरेश रोकडे हे आपल्या विद्याथीर्नींना पत्रलेखनाची गोडी लावत हा अमुल्य ठेवा भावी पिढीला सोपवत आहेत.पत्रलेखन हा एकेकाळी सुख,दु:खे वाटुन घेणारा वाट पहावयास लावणारा सर्वसामांन्याचा जिव्हाळ्याचा विषय.अब्राहम लिंकनचे शाळेच्या मुख्याध्यापकास पत्र असो की राष्ट्रपिता महात्मा गांधी, सानेगुरुजी, सावरकर आदी महापुरुषांनी कारागृहातुन लिहलेली पत्रे आजही मन चेतवतात, आज व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांमुळे पत्रव्यवहारच दुर्मीळ होत चाललाय. अशा स्थितीत भावना मांडताना विचार अभिव्यक्तीला चालना मिळावी, अक्षर सुधारावे, एखाद्या विषयावर आपण बोलु शकत नाही पण लिहु शकतो, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची तळमळ शिक्षक सुरेश रोकडे यांची यामागे आहे.मागील काही वर्षापासून कन्या शाळेतील या मुलींनी रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पाठ्यपुस्तकातील कविता, पाठ लेखन करणाऱ्या लेखकांना पत्र लिहून त्या-त्या कार्यक्षेत्रात त्यांचे कामाविषयी गौरवोद्गार व शुभेच्छा दिल्यात. मान्यवरांनी दिलेल्या उत्तरादाखलच्या पत्रांमुळे या मुलींचा आनंद गगनात मावेनासा होतो.‘लोकमत’ च्या वृत्ताला सलाम... :वेदनांच्या अंथाग आर्णवात सरस्वतीचा खळखळाट. या लोकमत मधील हद्यस्पर्शी वृत्ताने भारावुन जात शिक्षक सुरेश रोकडे यांच्यासह या कन्या शाळेतील मुलींनी आर्णव व त्याची आई शितल यांच्या जिद्दीला अभिवादन व लोकमत च्या लेखणीला सलाम करणारी भावना मांडत वृत्तासमच हद्यस्पर्शी पत्रे लिहून शुभेच्छा दिल्यात.

टॅग्स :Jalgaonजळगाव