शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रावेरच्या रथोत्सवात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 21:27 IST

श्री दत्त आणि श्री कृष्णाचा जयघोष, रेवड्यांची उधळण

रावेर : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा जयघोषात व रेवडी.. रेवडी..ची हाक देत रेवड्यांच्या उधळणीत प्रसाद झेलत रथोत्सवात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. युवकांनी मोठ्या भक्तीभावाने श्री दत्त-कृष्णरथ ओढला. शहराला १८१ वी प्रदक्षिणा रथ मिरवणुकीने भावभक्तिने शुक्रवारी पुर्ण केली.इस्कॉन भजनी मंडळांच्या श्री राधा-कृष्ण व श्री राम-कृष्णनामाच्या सुरेल भजनांच्या तालात दत्त्त-कृष्णभक्तांनी रथोत्सवातून ओसंडून वाहणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती घेतली. साक्षात श्री दत्तस्वरूप सद्गरु श्री सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी उभारलेल्या प्रतिगाणगापूर स्वरूप नालाभागात उभारलेल्या श्री दत्तमंदिरातून मंगल वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेतून ऋषीकेष कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी या दाम्पत्याने डोईवर श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुका तर विकास राजगुरू यांच्या डोईवर भगवान गोपालकृष्णाची मुर्ती रथापर्यंत आणल्या. तद्नंतर गणेश, भगवान गोपालकृष्णाची व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांची रथात प्रतिष्ठापना केली. संजय मटकरी व आशिष कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.दरम्यान, नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनगराध्यक्ष सादीक शेख यांचेसह नगरसेवक अ‍ॅड. सुरज चौधरी, यशवंत दलाल, सतीश अग्रवाल, जी पी अग्रवाल, श्रीराम अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल, सुधीर अग्रवाल, सुनील अग्रवाल, वाणी परिवारातील बापू वाणी, अवधूत वाणी व परंपरागत मोगरी लावण्याची सेवा बजावणारे कैलास कासार , मंगेश कासार, निलेश पाटील, भूषण कासार, दिलीप कासार, मुकेश पाटील, प्रविण पाटील, संदीप कासार, मनसुकलाल लोहार, देविदास वाणी, धनंजय वाणी, श्रीधर मानकरे, डॉ. दत्तप्रसाद दलाल, प्रतिक पाटील, राहूल महाजन आदींचा सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी मुस्लिम पंचकमेटीतर्फे गयास शेख, नगरसेवक आसिफ मोहंमद, सादीक शेख, असदुल्ला खान, युसूफ खान, अ‍ॅड एम ए खान, समद शेख, अय्युबखाँ भुरेखाँ पठाण आदींनी पाचवे गादीपती श्रीपाद महाराज व मोगरीची सेवा बजावणाºया सेवेकरींचा सत्कार केला.रथ परिक्रमेच्या मार्गात घराघरातून सुवासिनींनी भगवान गोपालकृष्ण व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांचे औक्षण करून दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रथावर रामचंद्र राजगुरू, विकास राजगुरू, रवींद्र सराफ व ऋषीकेश महाराज यांनी पुजेची सेवा बजावली.रथचौकातून भोईगल्ली, महात्मा गांधी चौक, हेडगेवार चौक, मेनरोड, नालाभाग, चावडी, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, श्री स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती ते थेट लालबहादूर शास्त्री चौकापर्यंत रथाची परिक्रमा पूर्ण करतांना लाखो तरूणाईच्या अपुर्व उत्साहाने रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक चालली. लाखो भाविकांची फुललेली मांदियाळी व रस्त्यावर खेळणी, मिष्टान्न भांडार व रेवड्यांच्या थाटलेल्या दुकानांनी यात्रोत्सवात एकच बहर आला होता.पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव पोलीस दलाची, जिल्हा नियंत्रण पोलीस दलाची राखीव तुकडी व स्थानिक पोलीस बलासह होमगार्ड बंधू भगिनींचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.