शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भगवान महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली जळगावनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:34 IST

भव्य शोभायात्रेने फेडले डोळ््याचे पारणे

ठळक मुद्देजन्मकल्याणक महोत्सवाचा अपूर्व उत्साहप्रबोधनात्मक देखावे

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांच्या डोळ््यांचे पारणे फेडले. मिरवणुकीदरम्यान करण्यात आलेल्या भगवंतांच्या जयघोषाने शहर दुमदुमून निघाले. या शोभायात्रेने पाणी बचाव, देहदान, रक्तदान, बेटी बचाव असे विविध संदेश देत संस्कृतीचे दर्शन घडविले. महावीर जयंती निमित्त झालेल्या रक्तदान शिबिरासही भरघोस प्रतिसाद मिळाला. जैनम् जयती शासनम् जैन धर्म की शान है....अशा भक्तीगीतांनीही लक्ष वेधून घेतले.शिस्तबद्ध मिरवणूकभगवान महावीर स्वामी यांच्या २६१७व्या जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत गुुरुवारी सकाळी साडेसात वाजता काँग्रेस भवनासमोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरात संघपती दलुभाऊ जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी, मनोज सुराणा, राजेश जैन, भागचंद जैन यांच्याहस्ते ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता महावीर स्वामींच्या सवाद्य मिरवणुकीस मंदिरापासून सुरुवात झाली.सजविलेली बग्गी व चंदेरी रथातून महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत भगवंतांचा जयजयकार करीत महिला-पुरुषांनी भक्तीगीत सादर केले. नेत्रदीपक वरघोडा मिरवणूक तसेच पंचरंगी ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.अडीच हाजारावर पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष आणि लाल साड्या घातलेल्या महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. समाजबांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले. या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे समाज प्रबोधन करणारे विविध देखावे मिरवणुकीत सहभागी झालेहोते. श्री वासुपूज्य जैन मंदिरापासून निघालेले ही मिरवणूक सुभाष चौक, सराफ बाजार, रथ चौक, चित्रा चौक मार्गे येऊन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ मिरवणुकीचा समारोपझाला. या मिरवणुकीत रथ, बग्गीसोबतच वाजंत्री, भजन रिक्षांचा सहभाग होता.

टॅग्स :JalgaonजळगावMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८