शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंती : रॅलीतून दिला सद्भावनेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:22 IST

सुरेशदादा जैन, अशोक जैन यांची उपस्थिती

जळगाव : भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे सोमवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले. शिवतीर्थापासून निघालेल्या या सद्भावना रॅलीमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलूभाऊ जैन यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होेते. भगवान महावीरांच्या नामाचा जयघोष सद्भावननेचा संदेश देण्यात आला.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त १३ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी युवक-युवतींसाठी गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे महेंद्र मुकीम यांचे प्रेरक उद्बोधन झाले. त्यानंतर सायंकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली. या ठिकाणी सामूहीक नवकार मंत्राचा जप करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ह्यजैनध्वजह्ण दाखवून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली. यावेळी पारस राका, कांतीलाल कोठारी, शंकरलाल कांकरिया, नरेंद्र जैन, अजय ललवाणी उपस्थित होते. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या रॅलीचा समारोप बालगंधर्व खुले नाट्यगृहात झाला.बैलगाडीवर २४ तीर्थंकरांच्या प्रतिमाया सद्भावना रॅलीमध्ये आकर्षक पद्धतीने बैलगाडीला सजविण्यात आल्या होत्या. त्यावर जैन धर्मातील २४ तीर्थंकरांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक तीर्थंकरांनी समाजासाठी सांगितलेला संदेश या प्रतिमांमधून वर्णन करण्यात आला होता. नागरिकांनी बैलगाडीमध्ये ठेवलेल्या तीर्थांकरांच्या प्रतिमा दर्शनासाठी गर्दी केली होती.नवकार प्रतिष्ठानच्या ढोल-पथकाने रॅलीत आली रंगतजैन बांधवांच्या तरुणांनी यंदा प्रथमच नवकार प्रतिष्ठान नावाने ढोल पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकातील ७० जणांच्या पथकाने एका तालात व सुरात ढोल वाजवून सर्वांचे लक्ष वेधले. रॅली यशस्वीतेसाठी रितेश गांधी, आयुष गांधी, सिध्दार्थ डाकलिया, परेश सिनकर,रोहित भावसार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव