शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जळगाव रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहनधारकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:33 IST

खान्देश सेंट्रल मॉलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वेस्टेशन नजीक पार्कींग केल्यास अनधिकृतपणे पार्र्कींगचे पैसे बळजबरीने वसुलीचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजळगावातील खान्देश सेंट्रलनजीकचा प्रकारठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करुन पैशांची मागणीजिल्हाधिकाºयांनी तयार केला होता रस्ता

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२६ : खान्देश सेंट्रल मॉलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वेस्टेशन नजीक पार्कींग केल्यास अनधिकृतपणे पार्र्कींगचे पैसे बळजबरीने वसुलीचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार नेहमीचाच असल्याच्या तक्रारी आहेत. गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमरास हाच अनुभव अ‍ॅड. सुशील अत्रे यांना आला. एवढेच नाही तर पैसे वसुलीसाठी त्यांना दमदाटीही झाली.जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी गेल्या वर्षी गोविंदा रिक्षा स्टॉपपासून ते थेट रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी हा रस्ता तयार केला आहे.हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्याशेजारीच रेल्वे स्थानकाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेवर रेल्वे प्रवाशांसाठी पार्किंगची स्वतंत्र सुविधा भाडे तत्वावर उपलब्ध केली आहे.दरम्यान, हा रस्ता सोयीचा तयार झाल्यामुळे अनेक प्रवासी या रस्त्यानेच आपल्या नातलगांना सोडण्यासाठी येत असतात. दोन मिनिटाचे काम असल्याने या मार्गावर रेल्वेस्टेशन जवळच रस्त्यालगतच प्रवासी उतरेपर्यंत गाडी उभी करीत असतात.प्रवाशांना सोडल्यानंतर लगेच परत जातात. असे असतानाही वाहनतळाच्या ठेकेदाराच्या कर्मचाºयांकडून प्रवाशांकडुन रस्त्यालगत उभे करण्याचेही पैसे मागितले जातात.मॉलच्या पार्कीग झोन मध्ये पार्कीग केलेली नसताना रस्त्यालगत वाहन दोन मिनीट जरी उभे केले तरी तेथील कर्मचारी प्रवाशांकडुन दमदाटी करित बेकायदेशिरपणे पैसे मागण्याचे प्रकार सुरु आहेत.एखाद्या प्रवाशाने विरोध केल्यावर शिवीगाळदेखील केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.या प्रकारामुळे, प्रवाशांकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पार्किंगच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडुन केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावParkingपार्किंग