शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

धुळ्यातून लंपास सोयाबीन पिंगळवाडय़ात सापडले, एक जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:12 IST

धुळ्यातील अवधान शिवारातील एमआयडीसीमधून एका ट्रकमध्ये भरलेले सोयाबीन पिस्तुलाचा धाक दाखवून पळविण्यात आले होते, चार दिवसानंतर त्या सोयाबीनचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसुमारे दहा लाख रुपये किंमतीचे आहे सोयाबीनपोलिसांनी पाळत ठेवून टाकली धाड

ऑनलाईन लोकमत अमळनेर, दि.18 : पिस्तुलाचा धाक दाखवून धुळ्याहून पळवलेला सोयाबीन भरलेला ट्रक अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे खाली झाला असून मारवड पोलिसांच्या सतर्कतेने 261 सोयाबीनच्या गोण्या हस्तगत करण्यात आल्या आहेत, याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रानुसार, धुळे एमआयडीसीमधील महाराष्ट्र ऑईल मिलच्या आवारातून गुरुवारी काही दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलचा धाक दाखवून ट्रक (क्रमांक एमएच 43- इ 3475 ) हा दहा लाखांच्या सोयाबीनसह पळवून नेला होता आणि ट्रकचालक व इतर दोघांना जामनेर तालुक्यात सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र शुक्रवारी हाच ट्रक अमळनेर तालुक्यातील मुडी (प्र अ) या गावात वळवण्यासाठी आला असता गावदरवाज्याला त्याचा धक्का लागल्याने सिमेंटचा धक्का तुटला त्यामुळे गावकरी चिडले. त्यांनी नंबरसह ट्रकचा फोटो काढून नुकसान भरपाई म्हणून एक हजार रुपये घेतले तर किरकोळ बाब म्हणून पोलिसांनी दुर्लक्ष केले. चालक दारू प्यालेला होता. रात्रभर तो ट्रक शेजारी हिंगोणे बुद्रूक गावाजवळ थांबला. शनिवारी तो ट्रक परत नंदगावमार्गे गांधली गावावरून पिंगळवाडे येथे आला. तेथे गावात सोयाबीनच्या गोण्या उतरविण्यात आल्या, तथापि काही गावक:यांना एवढे सोयाबीन इकडे पिकले नाही म्हणून संशय आला त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. तथापि रविवारी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच पिंगळवाडे येथील रवींद्र भाईदास देशमुख ( 50) याने तो माल गुपचूप हमाल लावून ट्रॅक्टरच्या माध्यमातून दक्षिणेकडील गट नंबर 80/1 व 80/2 मधील शेतात गोदामात भरणे सुरू केले. दरम्यान, सहायक फौजदार प्रभाकर भामरे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांनी पाळत ठेवली आणि संशय बळावल्याने त्यांनी डीवायएसपी व प्रभारी अधिकारी सुरेश मोरे यांना घटना कथन केली आणि काही कर्मचा:यांची मदत मागितली. तोपयर्ंत 3 ट्रॅक्टर खाली झाले होते. तेवढय़ात मारवडचे पोलीस नाईक संजय बोरसे, कैलास सोनार, किरण सोनवणे आणि चालक दिनेश कुलकर्णी मदतीला आले. अंधार झाला होता तरीही पोलिसांनी चहूबाजूने गोदाम घेरले आणि छापा टाकला. मालक रवींद्र देशमुख याला विचारपूस केली असता तो भांबावला, सोयाबीन त्याचेही नव्हते आणि ते धुळे येथील सुनील बोरसे नामक व्यक्तीचे असल्याचे सांगत होता. मात्र ती व्यक्ती ओळखीची नाही, माल सहज ठेवला असे सांगू लागला. पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी त्याला सीआरपीसी 41 (1) ब प्रमाणे अटक केली. दरम्यान, अधिक चौकशी केली असता धुळे येथून गायब झालेला ट्रक आणि मुडी येथे आलेला ट्रक एकाच क्रमांकाचा निघाला, म्हणून पिंगळवाडे येथे आलेला ट्रक तोच असावा आणि जप्त केलेले प्रत्येकी 50 किलो प्रमाणे 261 सोयाबीनच्या गोण्या चोरीतीलच असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. यामुळे मोहाडी ( ता. धुळे ) पोलीस स्टेशनचे प्रभारी पो. नि. अभिषेक पाटील यांनी रात्रीच मारवडला भेट दिली. दरम्यान, आरोपी रवींद्र देशमुख यास अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्या. वहाब सय्यद यांनी त्यास मोहाडी ता . धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिल्याने मारवड पोलिसांनी आरोपी देशमुख यास मोहाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.