शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला श्वानाला गुंगीचे पदार्थ देऊन फोडले घर, १२ ते १५ लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:18 IST

घरांच्या कड्या बाहेरुन लावून घेतल्या

चाळीसगाव, जि. जळगाव : शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या औरंगाबाद रोडलगतच्या प्रभात गल्लीतील राहत्या घरी चोरट्यांंनी शनिवारी पहाटे लाखोचा ऐवज लुटून नेला. कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांचे घरही चोरट्यांनी फोडले. औरंगाबाद रस्त्यावरील रामवाडी परिसर देखील चोरट्यांनी टार्गेट केला. येथे काही घरांच्या कड्या बाहेरुन लावून एका घरातून तीन हजार रुपये रोख आणि एक मोबाईल चोरुन नेला. चोरट्यांनी गल्लीतील कुत्र्यांना गुंगीचे पदार्थ दिली असल्याची बाबही समोर आली आहे.प्रभातगल्ली या अंत्यत गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने शनिवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. श्यामलाल कुमावत यांचे शेजारी - शेजारीच तीन घरे आहेत. यापैकी एका घरी चोरट्यांनी कपाटांमधील सामान आस्ताव्यस्त फेकून रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दागिने असा एकुण १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान सकाळी सर्वप्रथम कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांच्याकडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर अन्य काही घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याचे आढळून आले. कुत्रेही गुंगीत असल्याचे दिसून आले. थोड्या वेळात श्यामलाल कुमावत यांचेही घर चोरट्यांनी फोडल्याचे दिसले.कुमावत यांच्या घराचे कूलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील त्यांच्या पत्नी, आई व मुलीचे, सोन्याचे दागिने आणि पन्नास हजाराची रोकडही लांबवली.प्रभात गल्ली हा नेहमी वर्दळ असणारा भाग असून चोरट्यांनी येथेही हाथ की सफाई दाखविल्याने नागरिकांमधून भीतीयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्याकडे चोरी झाल्याचे लक्षात येताच श्यामलाल कुमावत यांनी तातडीने पोलिस स्टेशनला कळविले. घटनास्थळाळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली. सविस्तर माहिती घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव