शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अवैध वाळू वाहतुकीवर करडी नजर

By admin | Updated: December 4, 2015 00:47 IST

यावल/बोदवड : अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची करडी नजर पडली आहे.

यावल/बोदवड : अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची करडी नजर पडली आहे. यावल येथे एक लाख 92 हजार तर बोदवड येथे 73 हजार रुपये दंडाची कारवाई अवैध वाळू वाहतूक करणा:यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, बोदवडचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या पुढे अवैध वाळू वाहतूक करताना जे आढळतील त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

त्यामुळे हा व्यवसाय करणा:यांमध्ये खळबळ उडाली आह़े यावल येथील महसूल विभागाने दोन दिवसात विविध ठिकाणी छापे टाकून 14 वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख 92 हजार 140 रुपये दंड वसूल केला.

यावल तहसील विभागाने वाळू माफियांवर धडक मोहीम राबविली आहे. दोन दिवसात विविध ठिकाणी पथकाने छापे टाकून 14 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांना एक लाख 92 हजार 140 रुपये दंड करण्यात आला. याकामी यावल मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार बामणोद मंडळ अधिकारी तलाठी विरावली व यावल यांनी कारवाई केली. 2 रोजी यावल-चोपडा रस्त्यावर साकळी गावाजवळ तहसीलदार विजयकुमार ढगे व सहकारी यांनी ज्ञानेश्वर दयाराम लोणारी (रा. आंदलवाडी, ता.रावेर) यांचे क्र. एमएच19-ङोड 3901 वाळूचे वाहन जप्त केले. त्यांना 40 हजार 830 रुपये दंड आकारला. 3 रोजी सुकलाल परशुराम परदेशी साकेगाव,ता.भुसावळ यांचे क्र. एमएच 18- सी 7003 वाहन माती वाहून नेताना बोरावल बुद्रूकजवळ पकडले. त्याला 16 हजार 230 रुपये दंड आकारण्यात आला. यावल येथे विकास वाल्मीक सपकाळे (रा.कासवा) यांचे वाहन खडीने भरलेले पकडले.त्याच्यांकडून 23 हजार 730 रुपये दंड वसूल केला. यावल येथे शिवलाल भागवत सपकाळे (रा.पिंप्री) यांचे विना क्रमांकाचे वाहन वाळू वाहून नेताना पकडले. त्यातून 12 हजार 930 रुपये दंड वसूल केला.

पाडळसे येथे माती वाहतूक करीत असताना रजनीकांत दत्तात्रय पाटील यांचे वाहन पकडून पाच हजार 430 रुपये दंड करण्यात आला. तर शरद भागवत सपकाळे (रा. भोलाणे, ता.जि. जळगाव) यांचे वाहन क्र.(एमएच 19-एएन 4134) वाळू वाहतूक करीत असताना विरावली गावाजवळ पकडून 12 हजार 930 रुपये दंड केला आहे. गौण खनिज वाहतूकदारांवर वक्रदृष्टी महसूल विभागाने दाखविली असल्याने शासनाच्या महसुलात वाढ होत आहे.

मात्र दहीगाव भागात गौण खनिजाची खुलेआम वाहतूक होत असून ही महसूल याकडे पाठ फिरवित आहे. ही खेदाची बाब आहे. तसेच 2 डिसेंबर रोजी आठ वाहनांवर कारवाई करून 80 हजार 60 रुपये दंड केला आहे. दोन दिवसात एकूण एक लाख 92 हजार रुपये दंड वसूल केला.

बोदवडला कारवाईचा दंडुका

नव्याने रूजू झालेले तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. 2 रोजी रात्री जळगाव येथील मालक छगन कोळी व दुसरे अमित बच्छाव यांची वाहने अवैधरित्या शहरात वाळूजी अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रात्रीच दुचाकीने माहितीच्या आधारावर वाहनांचा पाठलाग करीत वाहन पकडले व सकाळी त्यांना तहसीलदार कार्यालयात प्रत्येकी 36 हजार 600 रुपये असा एकूण 73 हजार 200 रुपयाचा दंड ठोठावला. या कारवाईने अवैध वाळू वाहतूकदारासोबत अवैध गौण खनिज वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. (लोकमत ब्युरो)