अमळनेर : लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम ‘लोकमत’ने प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे वाचकाला खरी माहिती ‘लोकमत’मधून मिळते, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला आहे. लोकमत अमळनेर विभागीय कार्यालयाचा १४ वा वर्धापनदिन शनिवारी (दि. ११) सायंकाळी साजरा झाला. जी. एस. हायस्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्याला राजकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती देत सोहळ्याची रंगत वाढविली आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चोपडा नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, चोपडा व्यापारी सेलचे अध्यक्ष अमृतराव सचदेव, पारोळा येथील जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. ललिता पाटील, चोपड्याचे माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख यांच्या हस्ते ‘कोरोनानंतरची भरारी’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक हरी वाणी, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, पराग पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, नगरसेवक भानुदास पाटील, बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुरेंद्र बोहरा, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जाधव, माजी संचालक मनोराज पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, मनीष पाटील, पी. जी. पाटील, संजय पाटील, अमृत ग्रुपचे केशव क्षत्रिय, बालाजी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, दौलत पाटील, बालाजी संस्थानाचे विश्वस्त अरुण वाणी, रमेश भगवती, माधुरी पाटील, रिटा बाविस्कर , माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, एल. टी. पाटील, भरत कोठारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, कामगार नेते सोमचंद संदानशिव, विनोद कदम, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी, संजय कासार, चंद्रकांत शिंपी, प्रमोद शिरोळे, दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत पाटील, मुख्याध्यापक जी. बी. पाटील, व्यापारी सुनील पाटील, समता परिषदेचे संतोष महाजन, अंकुश भागवत, टीडीएफचे अध्यक्ष सचिन पाटील, डॉ. शांताराम पाटील, वाय. टी. पाटील, पी. आर. पाटील, राजेश पाटील, अजय पाटील, प्रसाद नावरकर, एस. एन. पाटील, एस. बी. बाविस्कर, डॉ. मिलिंद नवसारीकर, दिलीप बहिरम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, साने गुरुजी पतपेढीचे चेअरमन सचिन साळुंखे, सचिव तुषार पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एम. ए. पाटील, भास्कर चौधरी, आर. जे. पाटील, सुशील भदाणे, क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघ, अडावदच्या सरपंच भावना माळी, राहुल बहिरम, अजय पाटील, रवींद्र बोरसे, किरण कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक रवी टाले व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले व
डिगंबर महाले यांनी आभार मानले.