शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

Lok Sabha Election 2019 : जळगाव लोकसभा मतदार संघात : युती-आघाडी जोमाने लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:50 IST

मतदार संघातून सरळ व काट्याची लढत

चंद्रशेखर जोशीजळगाव : लोकसभेच्या जळगाव ग्रामिण विधानसभा मतदार संघात तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. युतीतर्फे शिवसेना व आघाडीतर्फे राष्टÑवादी कॉँग्रेस हा पक्ष या मतदार संघात प्रबळ आहे.लोकसभा निवडणुकीत पारडे फिरवू शकतो असा मतदार संघ म्हणजे जळगाव ग्रामिण मतदार संघ आहे. २००९ पूर्वी जळगाव शहर व ग्रामिण मतदार संघ हे एकत्र होते. मात्र २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदार संघाचे विभाजन झाले. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे गुलाबराव देवकर हे या मतदार संघातून विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेने मुसंडी मारली. जळगाव तालुका व धरणगाव शहर व काही गावे या मतदार संघात येतात. सद्य स्थितीत या मतदार संघात भाजपा- शिवसेना प्रबळ आहे. जिल्हा परिषद, धरणगाव पालिका व पंचायत समिती युतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे युतीचे संघटन प्रबळ आहे. २००९ च्या निवडणुकीतील यशानंतर गुलाबराव देवकर यांच्याकडे कृषि, परिवहन व पालकमंत्री अशी जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक कामे करत संघटन वाढविले. युती-आघाडी दोघेही या मतदार संघात प्रबळ असल्यामुळे दोघेही आता जोमाने कामाला लागलेले दिसतात.युती - प्लस पॉर्इंट काय आहेत?ग्रामीण मतदार संघात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा होल्ड चांगला आहे. जिल्ह्यातील मुलखमैदान तोफ असा त्यांचा लौकीक आहे. प्रचार शैलीही गतिमान असल्याचा फायदा युतीला होऊ शकतो.युती - वीक पॉर्इंट काय आहेत?ग्रामीण मतदार संघात युतीत काही प्रमाणात बेबनाव आहे. भाजपाचे पी.सी. पाटील व गुलाबराव पाटील यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. तसेच धरणगावातही काही प्रमाणात वाद हे आहेतच.आघाडी - प्लस पॉर्इंट काय आहेत?२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत गुलाबराव देवकर हे या मतदार संघातून निवडून आले होते. यावेळी त्यांना मिळालेल्या राज्यमंत्रीपदामुळे त्यांनी अनेक कामे केली व त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो.आघाडी - वीक पॉर्इंट काय आहेत?जळगाव तालुक्यात कॉँग्रेसचे फारसे प्रस्थ नाही. राष्टÑवादी कॉँग्रेसला एकट्याच्या ताकदीवरच येथे अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण संघटनही फारसे बळकट नसल्याचेच लक्षात येते.शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्टÑवादीचे आव्हानहा मतदार संघ शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून परीचित होता. मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने गेल्या काही वर्षात मुसंडी मारली आहे. पक्षाची ताकद वाढली आहे.2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती होती. यावेळी राष्टÑवादीच्या गुलाबराव देवकर यांनी मुसंडी मारत यश मिळविले.2014 च्या निवडणुकीत युती नव्हती. मात्र गुलाबराव पाटील यांनी येथे संघटन मजबूत करत राष्टÑवादीकडून मतदार संघ ताब्यात घेतला.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती नव्हती. या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी मुसंडी मारत राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर यांचा पराभव करत बळकट स्थान निर्माण केले.मतदार संघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. पहिल्या निवडणुकीत राष्टÑवादीने तर २०१४ मध्ये शिवसेनेने येथे यश मिळविले.कोणाच्या होणार सभायुती - युतीतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पाशा पटेल यांची सभा घेण्याचे प्रस्तावित आहे.आघाडी - आघाडीतर्फे राष्टÑवादीच्या महिला राष्टÑीय प्रदेशाध्यक्ष फौजिया खान यांची सभा झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव