शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

Lok Sabha Election 2019 : मतदारांशी थेट संवाद - कोठे आहे ‘एक देश, एक कर’; व्यावसायिक कर अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:38 IST

व्यापाऱ्यांच्या मनात आहे तरी काय?, कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा?

एकाच ठिकाणी कर द्यायला व्यापारी तयारवस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्याने सरकारच्या उत्पन्नात भर पडली असली तरी सरकारने अद्यापही व्यावसायिक कर (प्रोफेशनल) कायम असल्याने त्याचा भूर्दंड व्यापाऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा कर तत्काळ रद्द करणे गरजेचे आहे. जीएसटीमध्ये ज्या दराने कर आकारला जातो, त्याचे दर वाढविले तरी चालतील, व्यापारी त्या दराने एकाच ठिकाणी कर भरण्यास तयार आहे, मात्र व्यावसायिक कर रद्द करावा.- ललित बरडिया, सचिव, जिल्हा व्यापारी महामंडळव्यापारी धोरणाकडे सरकारने लक्ष द्यावेसरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणीचा चांगला निर्णय आहे. त्यात हळूहळू बदल झाले, आताही काही बदल होणे अपेक्षित आहे. या सोबतच व्यापारी धोरणाकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापाºयांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे. त्यामुळे व्यापाºयांच्या धोरणाबाबत चर्चा होऊ शकेल. शहर व परिसरात साधनसामुग्री चांगल्या असल्यास व्यापार वृद्धीस चालना मिळते. त्यासाठी वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाल्यास व्यापारी वर्गास त्याचा मोठा फायदा होईल.- अनिल कांकरिया, संचालक, सुपर शॉपजीएसटीमध्ये सुसूत्रता आणखी वाढावीजळगाव शहरासाठी सरकारने व्यावसायिक दृष्टीने चालना देऊन मोठ्या कंपनी शहरात आणायला हव्या.त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासह व्यापारही वाढण्यास मदत होईल. जीएसटीच्या दरात सुधारणा करून त्याचा सर्वत्र सरसकट दर १२ टक्के करावा. त्यामुळे वस्तूंचे भाव कमी होऊन व्यापार वाढीस चालना मिळेल. जीएसटीमुळे व्यवसायात ५० टक्के सुसूत्रता आली असून ती १०० टक्के होण्याची आवश्यकता आहे.- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जळगाव व्यापारी महामंडळव्यापाºयांच्या मुख्य समस्येकडे लक्ष द्यागल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असल्यास सामान्य जनता असो की व्यापारी मंडळी यांचे प्रश्न मार्गी लागतात, हा सर्वसाधरण विचार असतो. त्यानुसार जळगावातही केंद्रात, राज्यात् सरकार असलेल्या पक्षाला महानगरपालिकेतही बहुमताने जळगावकरांनी निवडूण दिले. त्यामुळे येथील हुडको कर्जाचा प्रश्न तसेच व्यापारी गाळ््यांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील व्यापाºयांना व्यापार करणे सोयीचे होईल.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशनव्यापाºयांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे‘एक देश, एक कर’ अशी घोषणा करून देशात जीसएची लागू केली तरी अद्यापही जीएसटीचे दर वेगवेगळे असल्याने एक कर कोठेच नाही. त्यासाठी देशात सर्वत्र पाच, १२, १८, २८ टक्के जीएसटी असे वेगवेगळे दर न ठेवता एकच दर आकारावा. या सोबतच व्यापाºयांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे व त्यात व्यापाºयांचा सभासद असावे. आयकरात पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नात सरसकट सूट मिळावी. तसेच ५ ते १० लाखापर्यंतच्या उत्पन्नाचा स्लॅब १० टक्क्यांवर आणावा.- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव