शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांचा कौल मिळवण्याची भाजप व राष्टÑवादीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:18 IST

राष्टÑवादीकडूनही जोमाने प्रचार

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीेत शहरी मतदारांनी भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेऊन युती व आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे दिसून येत आहे.गेल्यावेळी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेने शहरी मतदारांनी भाजपाला कौल दिला होता. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात भाजपने आघाडी मिळविली होती. शहरी मतदारांच्या जोरावर ए.टी. पाटील यांनी राज्यातील दोन नंबरचे म्हणजे साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांचे मताधिक्य मिळविले होते.परिस्थितीत बदलयावेळी मात्र परिस्थितीत बदल दिसून येत आहे. केंद्रातील भाजप सरकारचे अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले आहेत. या बरोबरच सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात या सरकारला यश मिळू शकलेले नाही. नेमके हेच भांडवल करून राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे मतदारांसमोर जात आहेत. मतदारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी हाच आहे. या बरोबरच शेतीचे प्रश्नही गंभीर आहेत. बदलेली करनिती, नोटबंदी याचा परिणाम उद्योगांवर, शहरी भागावर झाला आहे. कोणतीही लाट हा प्रकार यावेळी दिसत नाही. शहरी मतदारांना आपल्याकडे वळविण्यावर युती-आघाडीची कसरत सुरू आहे. भाजपनेही यावर लक्ष केंद्रीत केले आहे.या लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर, अमळनेर, पाचोरा मतदार संघात युतीत उघड बेबनाव होता. अमळनेरमध्ये तर भाजपाच्या गटबाजीचे शक्तीप्रदर्शन झाले. ते एवढे विकोपाला गेले की व्यासपीठावर जलसंपदा मंत्र्यांच्या समोर माजी आमदार बी.एस. पाटील यांना मारहाण झाली याचे परिणाम या क्षेत्रात होऊ शकतात. डॅमेज कंट्रोलसाठी येथे प्रयत्न सुरू आहेत.कोणत्या भागात कोणाचा आहे होल्ड?मुस्लीमबहुल, दलित वस्ती भागात बहुजन वंचित आघाडी व एमआयएमच्या उमेदवारांना प्रतिसाद लाभत आहे.एरंडोल, पारोळा, जळगाव, चाळीसगाव या मतदार संघात भाजपाचा होल्ड आहे. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर या पक्षाची सत्ता आहे.पारोळ्यातील आमदार डॉ. सतीश पाटील हे राष्टÑवादीचे आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने त्यांनीही यावेळी शक्तीपणाला लावली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव