शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

भोकरी जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:57 IST

शिक्षक संख्या अपूर्ण असल्यामुळे भोकरी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेस मंगळवारी सकाळी दहा वाजता कुलूप ठोकले.

ठळक मुद्देअपूर्ण शिक्षक संख्येमुळे ग्रामस्थांनी उचलले पाऊलदखल न घेतल्यास करणार उपोषण

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : शिक्षक संख्या अपूर्ण असल्यामुळे भोकरी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेस मंगळवारी सकाळी दहा वाजता कुलूप ठोकले. दरम्यान, दोन शिक्षकांनी ग्रामस्थांना विनंती केल्यानंतर दुपारी एकला शाळेचे कुलूप उघडण्यात आले.या शाळेची पटसंख्या ५९६ आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असायला हवा. त्यानुसार येथे १९ ते २० शिक्षक पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात दोनच कार्यरत आहेत.येथे मात्र दोन शिक्षक नियुक्तीवर असल्याने आपल्या पाल्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे पालक वर्ग संतप्त झाला व त्यांनी भोकरी उर्दू शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. यामुळे शाळेच्या वेळेवर आलेल्या शिक्षकांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबावे लागले. जोवर शाळेच्या पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.येथे पाच वर्षांपासून नियुक्तीवर असलेले सलीम यांची नुकतीच भडगाव येथे बदली झाली आहे. ग्रामस्थांनी सलीम यांना परत या शाळेवर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासोबत रईस अजीज व जाकीर जनाब अशा आणखी दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, या शाळेवर दोन शिक्षक राहिले आहेत. तसेच मागील एक वर्षापासून रईस बागवान नामक शिक्षक या शाळेला दिलेला आहे, पण सदर शिक्षक शिंदाड, ता.पाचोरा शाळेवर सेवा बजावत आहे. अशपाक शिकलकर या शिक्षकाची भोकरी उर्दू शाळेला आॅर्डर निघालेली आहे. परंतु ते अजूनही शाळेला हजर झाले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या सर्व विषयांची गंभीरपणे नोंद घ्यावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, असेही येथे उपस्थित संतप्त पालक व ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुक्तार गुलाब, भोकरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ.अल्ताफ शफी, माजी पंचायत समिती सदस्य रशीद कहाकर, असलम काकर, हमीद सुलेमान, हमीद अकबर, अकील अहमद, जाफर इमाम, निगरी भाई, जाकीर लुकमान आदी ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.उपस्थित दोघा शिक्षकांनी विनंती केल्यानंतर अखेर दुपारी शाळेचे कुलूप उघडण्यात. नंतर शाळा पूर्ववत सुरू झाली. उद्या शिक्षक मिळाले नाही तर पुन्हा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणPachoraपाचोरा