शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कळमसरे येथील बालिका अत्याचार प्रकरणी पालकांनी ठोकले शाळेला कुलूप, शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:55 IST

शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी केली

ठळक मुद्देमुली व पालकांचे घेतले जबाब बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. २४ - कळमसरे जि. प. शाळेच्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाºया जगदीश भास्कर पाटील या शिक्षकावर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दुसºया दिवशीही या घटनेचे पडसाद उमटून संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. मुलींच्या शाळेत महिलाच शिक्षिका नेमाव्यात ही भूमिका घेऊन जगदीश पाटील यास बडतर्फची मागणी केली. शाळेतील इतर शिक्षकांनी अखेर बाहेर वर्ग भरवून मुलांना शिकवले. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी एस.डी. वायाळ यांनी संबंधित शिक्षकास निलंबित करण्याचे आदेश देऊन सोमवारी बडतर्फीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागास दिल्या. 

घटनेचे वृत्त कळताच गटशिक्षणाधिकारी अशोक बिºहाडे, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, स. पो. नि. अवतारसिंग चव्हाण यांनी शाळेत भेट दिली. शिक्षणाधिकाºयांना ही घटना समजल्यावर त्यांनी उपजिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांना शाळेत चौकशीसाठी पाठवले तर बिºहाडे यांनी मुली व पालकांचे जबाब घेतले.यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही भ्रमणध्वनीवरून उपसरपंच मुरलीधर महाजन यांना पालकांच्या सोबत असल्याचे सांगितले. मधुकर माली, मनोज चौधरी, अशोक बाविस्कर, शेतकी संघ संचालक पिंटू राजपूत, अतुल नेमाडे यांच्यासह अनेक पालक हजर होते.घटना गंभीर असून शिक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याचा बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा. कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाउपशिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांनी भेटी प्रसंगी सांगितले.

टॅग्स :AmalnerअमळनेरSchoolशाळा