मोठे वाघोदा, ता. रावेर : पीक विम्याच्या पैशांबाबत वारंवार विचारणा करूनही नकार ऐकायला मिळत असल्याने येथील संतप्त शेतकºयांनी जिल्हा बँक शाखेला कुलूप ठोकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.तालुक्यातील मोठे वाघोदा येथील शेतकºयांनी मंगळवारीही दुपारी बँकेत जाऊन पीक विम्याचे पैसे आलेत का अशी विचारणा केली, पण नेहमीप्रमाणे नाही उत्तर मिळाल्यामुळे संतप्त सर्व शेतकºयांनी जमा होऊन बँकेचे कामकाज बंद करून बँकेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. मागील काही दिवसांपूर्वी पीक विम्याची मंजूर झालेली यादी बँकमध्ये आली होती पण त्या याद्यांमध्ये क्षेत्रफळ, नाव, गावाची नावे यात भरपूर चुका आढळून आल्या होत्या. त्यामुळे या याद्या तपासणीसाठी व चुका दुरुस्त करण्यासाठी परत पाठवण्यात आल्या. ३ महिन्यांनंतर त्या परत आल्या, पण सहा ते सात महिने उलटूनही शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. दररोज शेतकरी बँकेमध्ये जाऊन विचारपूस करत आहे. मंगळवारी देखील शेतकºयांनी शाखा व्यवस्थापक व तेथील कर्मचाºयांना विचारणा केली पण अजूनही पैसे न आल्याचे उत्तर मिळाले. त्यावेळी किशोर पाटील यांनी यासंदर्भात वरिष्ठांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी उद्या मुंबईला यासंदर्भात बैठक आहे, त्यावेळी हा विषय घेऊन तुमचे पैसे दोन ते तीन दिवसात देतो असे आश्वासन दिले. पण असे आश्वासने देणे हे कधीपासूनच सुरू आहे, असे संबंधीतांना किशोर पाटील यांनी सांगून वाघोदा येथील बँकेच्या शाखेला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत नितीन सुपे, प्रतीक पाटील, कुलदीप पाटील, अजय महाजन, स्वप्निल प्रकाश महाजन, राजू महाजन, गोविंदा चौधरी, सुनिल चौधरी यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, याबाबत शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या शाखेत पैसे आलेले आहेत पण बँकेतून शेतकºयांना पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे.शेतकºयांचा सर्व पैसा मोठ्या बँकेला टाकून त्याचा वापर व व्याज खाण्याचा प्रकार अधिकारी वर्ग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हा बँकेच्या शाखेला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 02:02 IST
पीक विम्याच्या पैशांबाबत वारंवार विचारणा करूनही नकार ऐकायला मिळत असल्याने येथील संतप्त शेतकºयांनी जिल्हा बँक शाखेला कुलूप ठोकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.
जिल्हा बँकेच्या शाखेला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
ठळक मुद्देसहा महिने उलटूनही पिक विम्याचे पैसे नाहीतपिक विम्याच्या पैशांबाबत विचारणा करूनही नकारघंटा