शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन सोबतच चिंताही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:59 IST

आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचा सूर : शहरवासीयांनो घरातच रहा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढली आहे. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातच राहणे योग्य असल्याचा सूरही उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी २१ दिवस देशभर लॉकडाउन जाहीर केले. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योग, व्यापार बंद असल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय,  चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने  ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडते की नाही, असे चिन्हे निर्माण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यात आता १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी संपून व्यवहार सुरू होतील, त्यामुळे त्या तयारीत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजक, व्यापाºयांची चिंंता वाढली आहे.  कोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे.

सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आज सर्वच उद्योग, व्यापारासमोर चिंतेचे ढग असले तरी सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका सर्वांना सहन करावा लागत असला तरी सर्वांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.