शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन अन् आजीबार्इंचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:24 IST

सध्याच्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असतानाही त्यात विरंगुळा करणाऱ्या आजीबार्इंविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे उपसंपादक विहार तेंडुलकर...

कोरोनाने अनेक बºयावाईट गोष्टी घडवल्या. दुभंगलेली माणसं मनानं जवळ आली, घराघरात बैठे खेळ होऊ लागले. एकत्र जेवण घेतलं जाऊ लागलं. शैक्षणिक संस्था बंद झाल्या तरीही आॅनलाईन क्लासेस सुरू आहेत. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरीही मुलांना काहीतरी शिकवावं, त्यांनी काही नवीन शिकावं म्हणून नेहमी घरातील नातवंडं शोधणारी आजी आज त्यांच्यासोबत रमू लागलेय. नातवंडे, घरातील कर्तीसवरती माणसं आजीबार्इंना तशी सायंकाळीच भेटतात. या लॉकडाउनमुळे नातवंडांना आजीसाठी खूपच खूप वेळ आहे. आजी-नातवंडांचं नातं खूप घट्ट करणारा हा हंगाम.यंदा उन्हाळी हंगामात उन्हाळी शिबिरे होतील की नाही, हे माहीत नाही. पण काही घरांमध्ये मात्र आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांना अनेक उपक्रम शिकवत जणू उन्हाळी शिबिरच घेतले आहे. लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वांचे सध्या ‘स्टे होम’ सुरू आहे. यावेळेचा कुणी कसा सदुपयोग करेल, हे सांगता येत नाही. अशात जळगाव येथील रत्नप्रभा गांधी या आजी अनोखी कलात्मकता वापरत नातवांनी संग्रहीत केलेल्या लग्नपत्रिका व कार्डशिटपासून भेटकार्ड, भेटपाकीटं, खेळणी, देवघरातील मखर व शाळेतील प्रकल्प तयार करण्याविषयी त्या मार्गदर्शन करतात. त्यांना हा छंद लहानपणापासूनच आहे. लॉकडाउनमधे सर्वत्र दुकाने बंद असल्याने नातवांसाठी लूडोचा व चेसचा छानसा गेम त्यांनी स्वत: हातानेच तयार केला आहे. लहान मुलांना त्या आपल्या कलेविषयी मार्गदर्शन करतात. त्यांनाही विविध उपक्रम करायला शिकवतात. यामुळे मुलेही या अनोख्या उपक्रमात आजींबरोबर रमून सहभागी होत आहेत.प्लायवूडपासून तयार केलेला पाळणा स्वत: सजवला आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे शालवर ‘श्रीराम जयराम जय जय राम’ ही ओळ एक लाख वेळा लिहिली आहे. दिवसातील काही वेळ त्या धार्मिक पुस्तके वाचनात आणि मेडिकलमधे बसवून घालवितात. कुटुंबात रमताना लॉकडाउनमधील रिकाम्या वेळेत नवं काहीतरी करण्याचा या आजींचा ध्यास तरूणाईसमोर नक्कीच आदर्श ठरेल आणि हे सर्व धडे त्या नातवंडांनाही देतात. आज जळगावमध्ये अनेक मुलं बाहेर खेळताना दिसतात. मात्र गांधी आजींची नातवंडं आज आपल्या आजीभोवती नवनवीन काहीतरी शिकत आहेत. कोरोनामुळे नात्याच्या संध्याकाळी नव्याने पहाट झालेय, असं आता वाटू लागलंय.-विहार तेंडुलकर, जळगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव