वरणगाव, ता. भुसावळ : येथील नागरिकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी आपला प्रभाग सोडून नदीच्या पार एक ते दीड कि.मी. पायी चालत जावे लागते. ते आपल्या प्रभागातच मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वरणगाव येथील प्रभाग क्रमांक ३ , ४ , ५ मधील अनेक गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते; परंतु त्यांना हे धान्य घेण्यासाठी एक-दीड कि.मी. चा पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे एवढ्या लांबून ओझे आणताना बरीच दमछाक व त्रास होतो. तरी वार्डाच्या मध्यवर्ती ठिकाणी धान्य मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना ' राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने देण्यात आले.
निवेदनावर राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवा उपजिल्हा वाय.आर.पाटील, पप्पू जकातदार, प्रकाश नारखेडे, विष्णू खोले, विनायक शिवरामे यांच्या सह्या आहेत.