शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

कर्जबाजारी मनपाने ११ कोटी ३६ लाखांची बिले केली अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:36 IST

नऊ महिन्यात ७३८ बिले मंजूर

जळगाव : आम्ही कर्जबाजारी असून आमच्याकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महानगरपालिकेने १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९ या नऊ महिन्यात ठेकेदारांची तब्बल ११ कोटी ३६ लाख ४५ हजार २११ रूपयांची बिले अदा केल्याची माहिती समोर आली आहे़ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्ता दीपककुमार गुप्ता यांना माहिती अधिकारात ही माहिती मनपाकडून पुरविण्यात आली आहे.महानगरपालिका कर्जात बुडालेली असताना कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास सुध्दा असमर्थ आहे़ एवढेच नव्हे तर शहरातील मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी केल्यानंतर मनपाकडे पैसे नसल्याची ओरड केली जात असते. दुसरीकडे शिक्षकांचे पन्नास टक्के वेतनाचे सुमारे पंधरा कोटी रूपये महानगरपालिकाकडे थकीत आहे़ त्यासाठी शिक्षक आंदोलन करून आपले हक्काच्या वेतनासाठी मनपाशी झगडत आहेत़ दुसरीकडे मात्र, मनपाकडे पैसे नसताना ठेकेदारांची बिले कशी अदा झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़नऊ महिन्याचा कालावधीतत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे असताना मागील वर्षी मनपाकडे पैसे नसताना ठेकेदारांची बिले अदा केली गेली असल्याची माहिती गुप्ता मिळाली. यावर त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९ या नऊ महिन्यात किती बिले अदा झालीत याबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता़आंदोलनाच्या इशाºयानंतर माहितीअनेक वेळा माहितीसाठी चकरा मारून सुध्दा माहिती मिळत नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ यावर त्यानुसार नुकतीच वेगवेगळ्या विभागातील बिले अदा झाल्याचे अकरा पानांचे प्रत त्यांना देण्यात आले. यावर अनेक ठेकेदारासह अनेकांना बिले अदा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.७३८ बिले केली पासमहानगरपालिकेने नऊ महिन्यात सुमारे विविध निधीतून विविध कामांची ७३८ बिले पास केली आहे़ यामध्ये सर्वसाधारण निधीतून ८ कोटी ४२ लाख २९ हजार ६३४ रूपयांची ४१९ बिले अदा केली आहे़ तसेच निवडणूक फंडातून १ कोटी ५६ लाख ६४ हजार ८८७ रूपयांची ३०९ बिले तर एक बिल १ कोटी ४० लाख ७ हजार ६४५ रूपयांचे काढण्यात आले आहे़ रस्त्यांच्या दुरूस्तीचे २६ लाख ८२ हजार रूपयांचे सहा बिले तर र्इंडस इंड प्रकारातील तीन बिले १ कोटी २० लाख ७४ हजार ८०५ रूपयांची अदा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले़ तसेच निवडकच ठेकेदारांची बिले अदा झाल्याचा अरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पेस्ट कंट्रोलसाठी जवळपास लाखो रुपयांची तीन बिले अदा करण्यात आली आहे.पेस्ट कंंट्रोल- (चार बिले) - २६ लाख रुपयेटी़ ए़ पाटील- १६ लाख ४ हजार ६११गणेश व्हिडिओ - ११ लाख ६ हजारशिवा सिक्युरिटी सर्व्हीसेस - ६ लाख ६० हजारएस़ के़ कॉन्ट्रॅक्टर ५ लाख ८२ हजारपी़ आर पाटील (अ‍ॅड)- ५ लाख २५००याबाबत आपण काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. या प्रकराची सविस्तर माहिती घेऊ. जर काही महत्त्वाची कामांची बिले असतील तर ती अदा करावीच लागतील. अन्यथा कामे कशी होणार?-उदय टेकाळे, आयुक्त

टॅग्स :Jalgaonजळगाव