शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:11 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील कौस्तुभ परांजपे...

वाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आलाच असेल. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती असतात असे वाटते. एकाचा वाद टाळण्याकडे व सामोपचाराने घेण्याचा कल असतो, तर एकाचा वाद घालण्याकडे.जेव्हा वाद टाळणाऱ्या व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा वाद वाढत नाहीत. जेव्हा एकाचा कल टाळण्याकडे व दुसºयाचा घालण्याकडे असतो तेव्हा वाद टाळणारा समजुतीने घेऊन लवकर थांबवितो. पण वाद घालणाºयाला मात्र त्याचा जय झाल्यासारखे वाटते. पण जेव्हा वाद घालण्याच्या विचाराच्याच व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा मात्र वाद विकोपाला जातो व त्यात संबंध कायमस्वरूपी बिघडण्याचा धोका असतो.परवा अशाच प्रकारचा वाद दोन व्यक्तींमध्ये चुकीच्या पध्दतीने दुचाकी लावण्यावरुन झाला. त्यावर ज्याचा वाद टाळायचा कल होता तो शांतपणे समोरच्या व्यक्तीला म्हणाला, मला फक्त येवढेच सांगा की तुम्ही सुशिक्षित आहात का? आणि आहे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य पध्दतीने दुचाकी लावली आहे का? याचा विचार केला तर वाद होणारच नाही.फक्त तुम्ही सुशिक्षित आहात का? हे एकच वाक्य माझ्या मनाला खूप आवडले. खरंच आपण सुशिक्षित आहोत का? आणि असल्यास काय करायला पाहिजे? याचा विचार केला तर कितीतरी वादाच्या गोष्टी सहज टळतील व सामंजस्य वाढेल हे पटल. हे एकच वाक्य मला खूप काही शिकवून किंवा सांगून गेले. अर्थात आपणही माणूस आणि त्यातही सर्वसामान्य आहोत, प्रत्येक वेळी तेवढा संयम आपल्याला असेलच असेही नाही. आणि काही वेळा माझं चुकलंच नाही तर का ऐकून घ्यावं ही (बाणेदार) वृत्ती आड येते. आपण जसं लिहीतो तसंच वागत नाही हे खरंय. पण तसं वागण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.वाद असावे असेही वाटते पण त्यातून चांगलेच घेण्याचा प्रयत्न असावा. ते विकोपाला जाता कामा नये. मागच्या वादाचा विषय पुढल्या विषयात आणू नये. परत नव्याने संवादाला सुरुवात करावी.बिघडवण्यापेक्षा घडवणे कठीण असते हे ध्यानात असू द्यावे. घडवणाºयाच नावं लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बिघडवणाºयाचं नाव विसरण्याचा प्रयत्न असतो. आपण लक्षात रहायचं का आपल्याला इतरांनी विसरायचा प्रयत्न करायचा हे आपण ठरवायचे आहे. पण फक्त शिक्षण घेतले म्हणून आपण सुशिक्षित आहोत असा अर्थ सुशिक्षित असण्याचा नाही.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव