चोपडा : येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात साक्षरता अभियान सप्ताह व गणेशोत्सवांतर्गत ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन स्पर्धांमध्ये रांगोळी, चित्रकला, विज्ञान प्रकल्प-प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे नियम पाळत स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी एनएमएमएस परीक्षेत सुरज संजय पाटील व धनश्री भिकन चव्हाण हे गुणवत्ता यादीत आल्याबद्दल व अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंडळ आयोजित देशभक्तीपर ऑनलाईन गीतगायन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ शिक्षक व्ही. पी. कोष्टी व रोटरी क्लबकडून ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल आर. सी. शिरसाळे यांचा गौरव करण्यात आला.
ऑनलाईन स्पर्धांचा निकाल असा - रांगोळी स्पर्धा
लहान गटातून - नेहा माळी, सोनाली पाटील प्रथम, पलक पाटील द्वितीय, साक्षी इंगळे तृतीय तर मोठ्या गटातून - गायत्री राठोड प्रथम, वैष्णवी राठोड द्वितीय, कोमल पाटील तृतीय. चित्रकला लहान गट - ओम चौधरी प्रथम, वेदांत राठोड द्वितीय, दर्शन पाटील, गायत्री गुरव तृतीय तर मोठा गट वैष्णवी पाटील प्रथम, गायत्री राठोड द्वितीय, वैष्णवी राठोड, वैष्णवी कोळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान प्रदर्शन - पायल पाटील प्रथम, वेदांत राठोड द्वितीय, प्रतीक सोनवणे तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाले.
यावेळी समन्वयक आर. डी. साठे, मुख्याध्यापक एच. बी. मोरे, एल. एच. अहिरे उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. पी. पाटील यांनी केले. विज्ञान प्रदर्शनासाठी एस. व्ही. पाटील, आर. सी. शिरसाळे, आर. पी. शाह, एम. एन. पाटील, व्ही. पी. बोरसे यांनी परिश्रम घेतले.