शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्रांची सूची जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

जळगाव : तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप ...

जळगाव : तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कुठल्याही सूचना नसल्या तरी विद्यार्थ्यांनी संबंधित प्रमाणपत्र जमा करून घेण्याचे सूचित केले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम, तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष वास्तुशास्त्र, बी प्लॅनिंग पदवी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एम. ई., एम.टेक, एम.फार्म, डी. फार्म, एमबीए, एमएमएस, एमसीए, आदी अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता शासनाकडून करण्‍यात आलेली नाही. मात्र, ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच प्रमाणपत्र जमा करून ठेवावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

प्रवेशासाठी असे आहेत आवश्यक प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहित केलेल्या प्रपत्रात सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), अल्पसंख्याकासाठी संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते, आदी प्रमाणपत्र प्रवेशासाठी आवश्यक असणार आहे.