शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अनेर नदीच्या डोहात बुडून लिपिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:41 IST

अनेर नदीत पुलाखालील डोहात बुडून नीलेश अशोक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देदोन जणांना वाचविण्यात यशयात्रेसाठी गेले होते १० जण

चोपडा, जि.जळगाव : अनेर नदीत पुलाखालील डोहात बुडून नीलेश अशोक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी घडली.येथील पुरवठा विभागातील लिपिक नीलेश गायकवाड, अव्वल कारकून रवींद्र नेतकर आणि रेशन दुकानदार मधुकर राजपूत, अरुण पाटील तसेच तहसील कार्यालयातील रोजंदारी कर्मचारी इजाज शेख, शशिकांत पाटील, मुकेश पाटील, रेशन विभागाचे बाबू जैन यांच्यासह १० जण २७ जुलै रोजी सकाळी चोपडा येथून ताजोद्दीन बाबा यात्रेसाठी निघाले होते. रस्त्यातच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमारेषेवर असलेल्या अनेर नदीवरील पुलावर सर्वजण थांबले. त्यातील लिपिक नीलेश गायकवाड, अव्वल कारकून रवींद्र नेतकर, मुकेश पाटील हे पुलाखाली नैसर्गिक विधीसाठी नदीत उतरले होते. मात्र नीलेश गायकवाड यांचा पाय घसरल्याने नदीत असलेल्या डोहात ते बुडाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी मुकेश पाटील हे डोहात उतरले. मात्र दोनजण बुडत असल्याचे पाहून सोबत असलेले अरुण पाटील यांनी डोहात उडी घेतली व मुकेश पाटील यांचे शर्ट पकडून त्यांना बाहेर काढले. तर लेश गायकवाड यानाही वाचविण्याचा प्रयत्न अरुण पाटील यांनी केला. मात्र दुर्दैवाने ते डोहात बुडाले. नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले. त्याच स्थितीत गायकवाड व इतरांना वरला, ता.सेंधवा, जि.बडवाणी (मध्य प्रदेश) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र नीलेश यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतरांवर उपचार करण्यात आले.गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी या घटनास्थळाकडे निघाल्या होत्या. घटनास्थळी निवडणूक नायब तहसीलदार राजेश पऊळ, अव्वल कारकून सुरेश पाटील, सतीश बोरसे, सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील हे गेले आहेत. तर तहसीलदार अनिल गावीत हे गायकवाड यांचे शव ताब्यात घेण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्नात होते.

टॅग्स :Deathमृत्यूChopdaचोपडा